Due to Mungantiwar’s efforts, 45 security guards became ward attendants! : मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळेच झाले शक्य
Chandrapur : चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या मार्फत नवीन सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात आली. याचा परिणाम म्हणून आधी कार्यरत असलेल्या ४५ कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करण्यात आले होते. पण राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे ते ४५ सुरक्षा रक्षक आता कक्ष सेवक म्हणून नियुक्त झाले आहेत.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ४५ सुरक्षा कर्मचारी गेल्या १० ते १५ वर्षांपासून कार्यरत होते. दरम्यान नवीन सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात आली. परिणामी है ४५ लोक बेरोजगार झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला होता. येवढ्यात मे. स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत सफाई कामकारांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती या लोकांना मिळाली.
Terrorist attack in Pahalgam : या निर्णयाने पाकिस्तानी नागरिकांना दिलासा
बेरोजगार ४५ लोकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली आणि उपरोक्त माहिती त्यांना दिली. या जागांवर नियुक्ती करण्याची विनंती कर्मचाऱ्यांनी केली. आमदार मुनगंटीवार यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेतली. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्याल रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना पत्र देऊन मे. स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत ४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यास सुचवले. अधिष्ठाता यांनी तात्काळ कार्यवाही करत ४५ कर्मचाऱ्यांना कक्ष सेवक पदावर नियुक्ती दिली.
कंत्राटी तत्वावर कक्ष सेवक पदावर नियुक्ती मिळालेल्या गौरी उंदीरवाडे, रुपा येरगुडे, दीपक वर्मा, संध्या आडेकर, गुड्डू निसरकार, पृथ्वीराज मरसकोल्हे, ममता राठोड, अक्षय सुखदेवे, प्रेम बारसागडे, प्रियंका अमरपवार, विश्वनाथ उराडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात येऊन त्यांचा सत्कार केला.