Congress’s mentality is Pakistani : मोदींविरोधातील भूमिका उघड, भाजपचे विजय अग्रवाल यांचा आरोप
Akola काँग्रेसची मानसिकता ही पाकिस्तानशी मिळती-जुळती आहे. म्हणूनच ते देशाच्या विरोधात भूमिका घेत आहेत, असा आरोप भाजपचे नेते विजय अग्रवाल यांनी केला. पाकिस्तानातील नेता चौधरी फवाद हुसेन याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ‘सर तन से जुदा’ असा उघड नारा दिला होता. त्याच धर्तीवर काँग्रेसने पंतप्रधानांचे छायाचित्र एडिट करून त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवर प्रसिद्ध केल्याचा आरोपही त्यांनी केला.
पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भाष्य करताना अग्रवाल म्हणाले, “काँग्रेस आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचं एकमेव टार्गेट म्हणजे नरेंद्र मोदी. दहशतवादी हिंदूंच्या नरसंहारावरून शांत असताना, काँग्रेसचे नेते मात्र राजकारण करून जनतेची दिशाभूल करत आहेत.”
Congress Satyagraha : उद्या परळीत काॅंग्रेसचा संकल्प सत्याग्रह !
ते पुढे म्हणाले, “कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री युद्ध नको अशी विधाने करतात, तेव्हा भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. या निषेधामुळे चिडलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भरसभेत कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर हात उचलला. सभेत काँग्रेसच्या महिला सरचिटणीसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकले नाहीत, ही त्यांच्या मानसिकतेची साक्ष आहे.”
विजय अग्रवाल यांनी काँग्रेसवर हिंदूंविषयी दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप करत सांगितले की, “एकीकडे काँग्रेस हिंदूंप्रती सहानुभूती दर्शवते, तर दुसरीकडे त्यांचंच खच्चीकरण करते. हे राजकारण जिल्हा पातळीपासून ते थेट राष्ट्रीय पातळीपर्यंत सुरू आहे.”
“पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची वेळ आली असताना काँग्रेस एकजुटीने देशाच्या पाठीशी उभं राहण्याऐवजी, पाकिस्तानची भाषा बोलते. तुष्टीकरणाचं राजकारण आणि वोट बँक याच्या पलीकडे त्यांना काही दिसत नाही,” अशी टीका अग्रवाल यांनी केली.
Prahar’s agitation : आता बच्चू कडू सर्व मंत्र्यांना घेरणार !
“निष्पाप भारतीयांचं रक्त केवळ ते हिंदू आहेत म्हणून वाहतंय, त्याची काँग्रेसला काहीच किंमत नाही. या मातीत राहूनही तिचा आदर नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,” असेही ते म्हणाले.