Breaking

Pombhurna Agriculture Office : ‘दिला शब्द केला पूर्ण’, मुनगंटीवारांच्या हस्ते पोंभूर्णा कृषी कार्यालयाचे उद्घाटन !

 

MLA Sudhir Mungantiwar inaugurated the Pombhurna Taluka Agriculture Office : शेती हा मजबुरीचा नव्हे तर मजबुतीचा व्यवसाय व्हावा

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथे कृषी अधिकारी कार्यालयाची आधुनिक आणि देखणी इमारत व्हावी, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी होती. ही मागणी त्यांनी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मांडली. त्यांनी नवीन इमारत उभारण्याचा शब्द शेतकऱ्यांना दिला आणि पूर्ण केला. महाराष्ट्र दिनी (१ मे) पोंभूर्णा तालुका कृषी कार्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

पोंभूर्णा तालुका ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण मागील काळात आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना दिले होते. तेव्हाच आमदार मुनगंटीवार यांनी कृषी कार्यालयाची इमारत उभारण्याचा शब्द दिला होता, तो त्यांनी पूर्ण केला. ‘दिला शब्द केला पूर्ण’, या उत्कीची अनुभूती पुन्हा जनतेला आली. याच इमारत बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देत त्यांनी २४९.९५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.

Railway Land Encroachment : २५ वर्षांपासून राहात असलेल्यांना बेघर करणार नाही, मुनगंटीवारांनी उचलले ‘हे’ पाऊल !

उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, प्रदेश महामंत्री अल्का आत्राम,अधीक्षक अभियंता (विद्युत) पुनम वर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, तहसीलदार रेखा वाणी, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, गटविकास अधिकारी विवेक बेलालवार, नगराध्यक्ष सुलभा पिपरे, उपनगराध्यक्ष अजीत मंगळगिरीवार, राहुल संतोषवार, बंडू गोरकार, रवींद्र मरपल्लिवार आदींची उपस्थिती होती.

नवीन कृषी कार्यालयाच्या माध्यमातून या विभागाचे कार्य अधिक प्रभावीपणे होईल आणि शेतकऱ्यांना अधिक प्रभावाने सेवा मिळतील. महाराष्ट्राचा जयजयकार करण्यासाठी कृषी क्षेत्र हे सर्वात महत्वाचे माध्यम आहे. त्यामुळे शेती हा मजबुरीचा नव्हे तर मजबुतीचा व्यवसाय व्हावा, हे केवळ नेत्याचे, अधिकाऱ्याचे काम नाही, तर यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित प्रयत्न करावे लागतील, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले.

Clean, beautiful city : स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षीत शहर हीच खरी सेवा !

बल्लारपूर बाजार समिती सर्वोत्तम करणार..
शेतकऱ्यांच्या हितासाठी मी कधीही मागे हटलो नाही, नेहमी पुढाकार घेतला आहे. बल्लारपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती उभारण्यासाठी मान्यता घेतली आहे, असे सांगत बल्लारपूरची कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रात सर्वोत्तम करण्याचा मानस आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या पाठीशी..
पोंभूर्णा तालुक्यात धडक सिंचन विहीरी, मागेल त्याला विहिरी दिल्या. तांत्रिक आणि सखोल ज्ञान मिळण्यासाठी मुलमध्ये नवे कृषी महाविद्यालय होत आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या माध्यमातून १५ ते २० कोटी रुपये खर्चून विविध अभ्यासक्रामांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधून पहिले प्रशिक्षण केंद्र चंद्रपुरातच होत आहे. बंधारे, मामा तलावांचा उल्लेख करून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.

MHADA houses : म्हाडाची १० हजार घरे बांधण्यासाठी मुनगंटीवारांच्या पुढाकारातून झाली आढावा बैठक !

पीक विम्याचे वाटप..
मुल आणि पोंभूर्ण्यामध्ये पिकवलेला तांदूळ मुंबईत मोठ्या प्रमाणात विकला जातो. तेथून परदेशातही निर्यात केला जातो. पण निर्यात शेतकरी करत नाहीत. यापुढे आपल्यालाही तांदळाच्या कट्ट्यांवर आपला शिक्का उमटवावा लागेल, असे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले. पुढील महिन्यात धानाचा १८०० कोटीचा बोनस मिळणार आहे. सोबतच येत्या पाच ते १० वर्षांत पोंभूर्णा आणि गोंडपिपरीच्या मध्ये ३० हजार एकरवर एमआयडीसी उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती आमदार मुनगंटीवार यांनी दिली. याशिवाय आत्तापर्यंत २०२ कोटींच्या पीक विम्याचे वाटप झाल्याचेही ते म्हणाले.