‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ पदयात्रेसाठी नेते एकवटले
Nagpur काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडी देशात अराजकता निर्माण करून विरोधी शक्तींना बळ देत असल्याचा गंभीर आरोप महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
बावनकुळे म्हणाले, युवकांची दिशाभूल करणे, घटनात्मक संस्थांवर हल्ले करणे आणि त्यांची बदनामी करून सत्तेवर येण्याचा काँग्रेसचा कुटिल प्रयत्न सुरू आहे.
‘गोकुळ’मध्ये महायुतीकडून सत्ताचोरीचा डाव; वडेट्टीवारांचा घणाघात
राहुल गांधी आणि विरोधी पक्षांचे हे षड्यंत्र उधळून लावण्यासाठी तसेच जनतेत जागृती करण्यासाठी भाजपच्या वतीने देशभरात रॅली व पदयात्रांचे आयोजन करण्यात येत आहे. नागपुरात आयोजित भाजपच्या ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ या पदयात्रेत ३० ते ३५ हजार नागरिक सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त करत बावनकुळे म्हणाले की, लोकशाही व घटनात्मक संस्थांबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या शक्तींना या पदयात्रेतून चोख उत्तर दिले जाईल असेहा बावनकुळे म्हणाले.
काँग्रेस आणि इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात आंदोलने सुरू केले आहे. दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
आर्वी बाजार समितीत राजकीय कलगीतुरा रंगला! आरोपांच्या फैरी मुळे राजकारण तापले
निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यावरून इंडिया आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. निवडणुका कशा मॅनेज करण्यात आल्या याची माहिती या माध्यमातून दिली जात असून त्याला प्रतिसाद लाभत असल्याने भाजपची झोप उडाली आहे. हे सर्व आरोप खोडून काढण्यासाठी आता भाजपही रस्त्यावर उतरली आहे.








