Case of bogus seed-fertilizer sellers : खरीप हंगाम आढावा बैठकीत बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर ताशेरे
Amravati शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना खपवून घेतले जाणार नाही. कर्तव्यात हयगय करणाऱ्यांवर कारवाई होणारच. पुढील पालकमंत्र्यांच्या खरीप आढावा बैठकीत दोन-चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची शिफारस करेन, असा ठणकावठणारा इशारा आमदार रवी राणा यांनी शुक्रवारी अमरावती व भातकुली तालुक्याच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत दिला.
शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी ग्रामस्तरावर जाऊन संवाद साधा, अशी सक्त ताकीद देताना आ. राणा यांनी कामचुकार अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. कृषी सहायक व तालुका कृषी अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले. काही अधिकाऱ्यांकडे योजनांची स्पष्ट माहितीच नसल्याचे समोर आले, तर अनेकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरेही दिली नाहीत. त्यामुळे राणा यांनी संताप व्यक्त केला.
Kirit Somaiya : घोटाळ्याचे दुष्परिणाम; सहा हजार जन्मदाखले रद्द होणार!
ते म्हणाले, “बोगस बियाणे, खते आणि फवारणी औषधांची विक्री थांबवा. त्यांच्या गुणवत्तेची चाचणी झालीच पाहिजे. कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही, याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. भरारी पथक सक्रिय ठेवा.”
तेहसील कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपविभागीय अधिकारी अजित येडे, तहसीलदार विजय लोखंडे, तसेच भातकुली व अमरावती तालुक्याचे कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी विभाग अधिकारी आदी उपस्थित होते.
Crop Insurance : पाच तास आंदोलन, त्यानंतर अधिकाऱ्यांचे आश्वासन!
बैठकीत शेतकरी व युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी उमेश ढोणे, मंगेश पाटील इंगोले, आशिष कावरे, दिनेश टेकाम, राजू रोडगे, ज्ञानेश्वर कळसकर, सुखदेव कराळे, अजय घुले, विनोद जायलवाल, गुड्डू आचलिया, बंडू डकरे, ओंकार मोहोळ, दिलीप पाटील, सौरभ माहुरे, आशिष गेडाम, नीलेश केवतकर, सुनील काळे, जयंत देशमुख आदींची उपस्थिती होती. या वेळी आमदार रवी राणा यांच्या हस्ते शेतकरी लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व पेरणी यंत्रांचे वाटपही करण्यात आले.