Breaking

ST bus driven : 2०२३ लाच ‘लॅप्स’ झाला आमदार संजय देरकरांचा परवाना !

Wani’s MLA Sanjay Derkar’s licenselapses’ ‘after 2023 bribes : एसटी बस तर नाहीच नाही, पण नियमांनुसार साधी कारही चालवू शकत नाहीत देरकर

Chandrapur : यवतमाळ जिल्ह्यातील वणीचे आमदार संजय देरकर यांनी एसटी बसेस लोकार्पण सोहळ्यानंतर सजवलेली बस शहरातील रस्त्यावर चालवली. यामुळे चांगली प्रसिद्धी मिळेल, असे त्यांना वाटले होते. पण झाले भलतेच.. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी या प्रकाराची तक्रार एसटी महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्याकडे केली. त्यामुळे आता आमदार महोदयांच्या मागे कारवाईचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.

माजी आमदार बोदकुरवार यांच्या तक्रारीनंतर विद्यमान आमदार आणि वणी आगाराच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले जात आहे. आमदार झालो म्हणून काहीही करण्याचा परवाना आपल्याला मिळाला, असे समजणाऱ्या आमदार देरकर यांनी आधी आपला वाहन चालक परवाना तपासून घ्यावा, असे आवाहन संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.

ST bus driven : फुकटच्या प्रसिद्धीसाठी वणीच्या आमदारांनी चालवली एसटी, माजी आमदारांची तक्रार !

आमदार देरकर यांच्या वाहन चालक परवान्यासंदर्भातील एक दस्तावेज ‘सत्तावेध’च्या हाती लागला आहे. त्यामध्ये त्यांना वाहन चालक परवाना १४.०२.२०२३ रोजी ‘लॅप्स’ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे जड वाहन चालवणे तर दूरच. पण आमदार देरकर साधी कार चालवण्यासदेखील आजमितीस पात्र नाहीत. त्यामुळे एस.टी. बस चालवल्याच्या प्रकरणात वणी आगाराच्या अधिकाऱ्यांवर तर कारवाई होईलच पण बेजबाबदार वर्तवणूक करणाऱ्या आमदार संजय देरकर यांच्यावरसुद्धा परिवहन विभागाने कारवाई करावी, अशी मागणी संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे.

Municipal corporation elections : विदर्भात भाजप – काँग्रेसमध्ये थेट लढत!

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामाचा धडाका लावला आहे. एकापाठोपाठ एक धडाधड निर्णय घेत आहेत आणि कारवाया करत आहेत. नियमानुसार एसटी बसचा चालक रस्त्यात बस थांबवून खाली उतरूसुद्धा शकत नाही. (बस नादुरुस्त झाल्याचा अपवाद वगळता ) अशात ज्या चालकाने किंवा अधिकाऱ्याने आमदार संजय देरकर यांना बस चालवू दिली, त्यांच्यावर नियमानुसार गुन्हा दाखल होतोच आणि परवाना, बॅज नसताना बस चालवून शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या आमदार संजय देरकर यांच्यावरही कारवाई होऊच शकते, असे परिवहन विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आणि हीच मागणी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे लाऊन धरली आहे.