Breaking

India – Pakistan War : शस्त्रसंधी झाली पण तणाव वाढला, मुंबईत हाय अलर्ट !

Ceasefire agreed but tensions rise, high alert in Mumbai : समुद्री मार्गावर सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

भारत आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरनंतर तीन दिवस संघर्ष चालला. त्यानंतर दोन्ही देशांकडून युद्धबंदीचा घोषणा करण्यात आली. शस्त्रसंधी मान्य करण्यात आली. यानंतर दोन्ही देशांतील तणाव कमी होईल, अशी अपेक्षा करण्यात येत होती. परंतु तणाव वाढला आहे. अशा स्थितीत देशातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. मुंबईत समुद्री मार्गांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

सद्यस्थितीत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करायचे नाही आहेत. कारण शस्त्रसंधीचा तसा करार झालेला आहे. पण करार झालायनंतरही पाकिस्ताने भारताच्या सीमेवरील काही राज्यांवर हल्ले केले. त्यानंतर भारतानेही आक्रमक होत पाकिस्तानला पुन्हा इशारा दिला. पाकिस्तानने हल्ले केल्यामुळे शस्त्रसंधीनंतरही प्रकरण गंभीर झाले आहे. उद्या (१२ मे) भारत आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांमध्ये अटी आणि शर्तींबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर काय होईल, याकडे दोन्ही देशांतील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

Food boycott agitation : वाढदिवशी रविकांत तुपकर करणार अन्नत्याग, काय आहे कारण ?

दुसरीकडे भारताने केलेल्या हल्ल्याची संधी साधत बलुचिस्थानने पाकिस्तानला चांगलेच घेरले आहे. बलुचिस्थान येथील बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानवरील हल्ल्यांत वाढ केली आहे. बीएलएने हल्ले वाढवत पाकिस्तानचे ३९ लष्करी तळ टार्गेट केले आहेत. या हल्ल्यांची जबाबदारीही बीएलएने स्वीकारली आहे. पाकिस्तानने भारताच्या बाबतीत काही गडबड केल्यास भारताची सेना सज्ज आहे. त्यामुळे पाकिस्तान चांगलाच कात्रीत सापडला आहे. आता पुढे काय होणार, याकडे सर्व जगाचे लक्ष लागलेले आहे. पाकिस्तान बलुचिस्थानच्या विरोधात आक्रमक होणार का, हेसुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे.