व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश Neet paper leak : सरकारसमोर राहुल गांधींच्या तीन ठोस मागण्या, मान्य झाल्यास...

Neet paper leak : सरकारसमोर राहुल गांधींच्या तीन ठोस मागण्या, मान्य झाल्यास कोंडी फुटेल?

rahul-gandhi-three-demands-over-neet-paper-leak-parliament-standoff : केंद्रावर शिक्षण व्यवस्थेवरून हल्लाबोल

New Delhi: नीट पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारसमोर तीन महत्त्वाच्या मागण्या मांडत, त्या मान्य झाल्यास संसदेतील सध्याची कोंडी दूर होऊ शकते, असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शिक्षण व्यवस्था, पेपरफुटीच्या घटनांवर सादरीकरण करत सरकारवर गंभीर आरोपही केले.

राहुल गांधी यांनी सर्वप्रथम केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिक्षणमंत्री म्हणून ते पूर्णपणे अपयशी ठरले असून शिक्षण मंत्रालय प्रभावीपणे चालविण्यात ते असमर्थ असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, अशी त्यांची पहिली मागणी होती.

दुसऱ्या मागणीत राहुल गांधी यांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणाऱ्यांची चौकशी करून संबंधितांविरोधात योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

Chandrashekhar bawankule : धर्मेंद्र प्रधानांनी पेपर फोडला का?, बावनकुळेंचा काँग्रेसला सवाल

तिसऱ्या मागणीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, अशी भूमिका मांडली. या मागण्या काँग्रेसच्या नसून देशभरातील विद्यार्थ्यांच्या असल्याचे सांगत, आपण त्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

यावेळी राहुल गांधी यांनी शिक्षण व्यवस्थेवर सादरीकरण करत गेल्या काही वर्षांतील पेपरफुटीच्या घटनांवर भाष्य केले. वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून या प्रकरणांमध्ये जबाबदार व्यक्तींवर प्रभावी कारवाई झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींमुळे विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

NEET paper leak : नीट पेपर फुटीवरून नागपुरात राजकीय वादंग; काँग्रेसची राजभवनावर धडक, पोलिस-कार्यकर्त्यांत झटापट

पेपरफुटीच्या घटनांमुळे अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला असून काहींनी टोकाचे पाऊल उचलल्याचाही दावा राहुल गांधी यांनी केला. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्यांना अशा गैरप्रकारांचा फायदा मिळू शकतो, मात्र प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे ते म्हणाले. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, राहुल गांधी यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या आपल्या अटकेचाही उल्लेख केला. स्वतःवर झालेली कथित मारहाण ही मोठी बाब नसून देशातील विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
___

error: Content is protected !!