Breaking

Centre of Indian trade unions : देशभरातील कामगारांचा श्रम संहितेच्या विरोधात एल्गार!

Nationwide agitation to repeal anti-worker labor code : कामगारविरोधी श्रमसंहिता रद्द करण्यासाठी देशव्यापी आंदोलन

Buldhana देशभरातील १० प्रमुख राष्ट्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने कामगारविरोधी चार श्रम संहिता रद्द करण्याच्या मागणीसाठी २० मे २०२५ रोजी एकदिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात आशा, अंगणवाडी व गटप्रवर्तक, तसेच शालेय पोषण आहार कामगारांनी १०० टक्के सहभाग नोंदवावा, असे आवाहन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU)चे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी केले आहे.

बुलडाणा येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत गायकवाड यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने मागील ३९ कामगार कायदे रद्द करून त्याऐवजी चार नव्या श्रमसंहिता लागू केल्या, या निर्णयामुळे कामगारांच्या अधिकारांवर गदा येणार असून त्यांचे सामाजिक सुरक्षा कवच धोक्यात येणार आहे.

Chandrashekhar Bawankule : लीज संपलेल्या खाणपट्ट्यांवर चौकशीचा बडगा

सिटू संलग्न अंगणवाडी, आशा व गटप्रवर्तक, तसेच पोषण आहार कामगार संघटनांच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक बुलडाणा येथे पार पडली. यामध्ये कामगारांच्या अधिकारांसाठी लढा देण्याचा आणि संप यशस्वी करण्याचा संकल्प करण्यात आला.

Field Testing Kit : दीड हजार गावांमधील पाण्याची होणार तपासणी!

संपाच्या दिवशी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर निवेदन
२० मे रोजी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व तालुका स्तरावर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदने सादर केली जाणार आहेत. ही निवेदने प्रकल्प अधिकारी (एकात्मिक बालविकास सेवा योजना), तालुका आरोग्य अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना दिली जातील.