Breaking

Rohini Khadse Sushma Andhare : सरकारने ‘लाडकी बहीण’ मानून प्रिया फुकेंना मदत करावी

Why didn’t the Women’s Commission take cognizance of Priya Fuke’s complaints? : रोहिणी खडसेंची मागणी; महिला आयोगाने तक्रारीची दखल का घेतली नाही?, सुषमा अंधारेंचा सवाल

Nagpur १२ मे २०२५ रोजी प्रिया फुके यांनी विनयभंगाची तक्रार दिली. यात तक्रारदाराने उलट प्रिया फुकेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. प्रिया फुके यांना चौकशीच्या नावावर दिला जात असलेला त्रास मुख्यमंत्र्यांनी थांबवावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाकडे असलेल्या महिला आयोगाला लक्ष द्यायला लावावे. सरकारने लाडकी बहीण मानून प्रिया फुके यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केली.

या प्रकरणार उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या ॲड. सुषमा अंधारे यांनी देखील सरकारला जाब विचारला आहे. प्रिया फुके यांच्या तक्रारीची दखल महिला आयोगाने का घेतली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांच्या भावाच्या पत्नी प्रिया फुके हिला घरातून हाकलून दिले. प्रिया यांनी पोलिसांत दिलेली एक तक्रार नोंदवून घेण्यात आली. उर्वरित तक्रारींची दखल घेतली गेली नाही. महिला आयोगाने याप्रकरणी चौकशी करावी, अशी विनंती प्रिया यांनी आयोगाला पत्र पाठवून केली. मात्र, आयोगाने दखल का घेतली नाही, असा सवाल सुषमा अंधारे व रोहिणी खडसे यांनी केला आहे.

Handloom Corporation Nagpur : हातमाग कामगारांना मिळणार सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी

‘अंधारे, खडसेंनी आमच्या कुटुंबाची बदनामी करू नये’
या प्रकरणावर प्रिया फुके यांच्या सासू डॉ. रमा रमेश फुके यांनीदेखील भूमिका मांडली आहे. आमच्या घरगुती वादाबद्दल राजकीय नेत्या सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे यांनी आमच्या कुटुंबीयांवर केलेले आरोप समाजाची दिशाभूल करणारे आहेत. कुटुंबाची बदनामी करण्याचे प्रयत्न होत आहेत. नातवंडांना भेटू दिले जात नाही. प्रत्येक वेळी पैशाची मागणी केली जाते. आमच्या कुटुंबाची समाजात बदनामी करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली.