Breaking

Nagpur Municipal Corporation : रस्ते खोदून ठेवले आणि पाऊस लवकर आला, आता मनपाला आली जाग

Commissioner warns contractors to repair roads before May 31 : पावसाळ्याच्या तोंडावर कंत्राटदारांना आयुक्तांकडून रस्ते दुरुस्तीचे आदेश

Nagpur पावसाळ्यापूर्वी शहरातील खोदकाम केलेले सर्व रस्ते ३१ मेपूर्वी पूर्ववत करण्यात यावेत अन्यथा संबंधित कंत्राटदारांवर दंड ठोठावण्याचे, तसेच फौजदारी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे यंदा अपेक्षेपूर्वीच पावसाने हजेरी लावली आहे. मान्सूनचे आगमन झालेले नसले तरीही त्याचे संकेत मात्र लवकर मिळाले आहेत. अशात नेहमीप्रमाणे मनपालाही उशिराने जाग आली आहे.

मागील अनेक महिन्यांपासून शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक सिमेंट रस्त्यांचे कामदेखील संथगतीने सुरू आहे. मात्र पावसाळ्याच्या तोंडावर आयुक्तांना जाग आली आहे की काय असा सवाल उपस्थित होत आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात सीवर लाइन, पिण्याच्या पाण्याची लाइन आणि इतर कामांसाठी रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. या रस्त्यांचे काम पूर्ण करून त्याला पूर्ववत करण्यासाठी बैठक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

MP Balwant Wankhede : शिवशाही बंद पडली, खासदारांनी जागेवरूनच केला अधिकाऱ्याला फोन

बैठकीत उपस्थित कंत्राटदार व अधिकाऱ्यांना खोदकाम केलेले रस्ते पुढील चार दिवसांत दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या. तसेच कर्तव्यात कुचराई करणाऱ्या महपालिकेच्या संबंधित अभियंत्यांवरसुद्धा कारवाई करण्याचा इशाराही दिला. जलवाहिनी तसेच फिडर लाइन टाकण्यासाठी ४०.९६ किलोमीटरचे काम सुरू आहे. त्यापैकी ३२.३३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. सध्या ८.६३ किलोमीटरचे काम अपूर्ण आहे.

Rohini Khadse Sushma Andhare : सरकारने ‘लाडकी बहीण’ मानून प्रिया फुकेंना मदत करावी

विशेष म्हणजे, यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत खोदकाम झाले आहे. आता हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सर्व कंत्राटदारांना देण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यात रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यास कंत्राटदारांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही डॉ. चौधरी यांनी दिला आहे. मात्र आयुक्तांना इतके दिवस हा प्रकार दिसला नाही का, असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.