व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण OBC Leader : तुझी उंची किती, तू बोलतो किती ?

OBC Leader : तुझी उंची किती, तू बोलतो किती ?

Prashant Pawar’s counterattack on Laxman Hake : लक्ष्मण हाके हा ओबीसी समाजाचा नेता नव्हे, तर दलाल

Nagpur : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यावर टीका करण्याचा सपाटा लावला आहे. अर्थ खात्याचा कारभार सांभाळण्याची त्यांची क्षमता नाही, इतपर्यंत टीका करण्याची पातळी हाकेंनी ओलांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नागपूर शहराध्यक्ष आणि प्रवक्ते प्रशांत पवार यांनी त्यांच्या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

यासंदर्भात एका वृत्तवाहिनाशी बोलताना प्रशांत पवार म्हणाले, काल जे हाके बोलले, ती त्यांची लायकी नाही. ते स्वतःला ओबीसीचे नेते समजतात. पण तसे नाहीये, ते स्वयंघोषीत नेते आहेत. खरं तर ओबीसी समाजाचे नेते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, माजी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, विद्यमान मंत्री छगन भुजबळ हे आहेत. आता हे हाके कुठून आले, हे कळत नाहीये.

RBI Repo Rate : आता खुशाल काढा कर्ज! कार, घराचा ईएमआय होणार कमी

जनावराला गोचीड जसं चिटकून राहतं, तसे अजित दादा अर्थखात्याला चिटकून आहेत, असे वक्तव्य त्या हाकेंनी केले. हे बोलण्याची त्याची लायकी नाही. त्याची उंची किती अन् तो बोलतो किती? त्याला अर्थ खातं तरी माहिती आहे का? आपली उंची आणि लायकी बघून बोललं पाहिजे. उचलली जीभ अन् लावली टाळ्याला, असं करू नये, असा सल्ला प्रशांत पवार यांनी हाकेंना दिला आहे.

अजित पवार सत्तेतून पैसा अन् पैशातून सत्ता मिळवतात, असेही लक्ष्मण हाके बोलले आहेत. जनता अजित दादांना मुख्यमंत्रिपदी पाहाण्यासाठी उत्सूक आहे. येवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल बोलताना त्याला लाज वाटायला पाहिजे. या राज्यातील पवार, पाटील आणि देशमुखांना बरंवाईट बोलण्याचा अधिकार हाकेंना नाही. हे लोक सत्तेत नको, हे सांगणारे हाके कोण? त्यांच्या भरोशावर ही सत्ता नाही. खरं तर लक्ष्मण हाके नेता नाही, तर दलाल आहे.

Revenue Department : ‘तिसरा डोळा’ पकडणार अवैध गौण खनिज उत्खणन !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघे ठरवतील की, निधी कुणाला, केव्हा आणि किती द्यायचा. यामध्ये लक्ष्मण हाकेला बोलण्याचा काही एक अधिकार नाही. आता आठ दिवसांच्या आत हाकेंनी माफी मागितली नाही, तर जेथे सापडेल, तेथे त्याला काळे फासल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रशांत पवार यांनी दिला आहे.

error: Content is protected !!