Breaking

Akola police : प्रहार, किसान ब्रिगेडचे कार्यकर्ते स्थानबद्ध, पोलिस action mode वर

Prahar, Kisan Brigade members detained : मुख्यमंत्र्यांच्या दौरादरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई

Akola राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकोला शहरात आंदोलनाची शक्यता लक्षात घेता, प्रहार जनशक्ती पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेणाऱ्या किसान ब्रिगेडसह शिवसेना Shiv Sena उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray पक्षाच्या शहरप्रमुखांनाही पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या अकोला दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, आंदोलनाची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी प्रहारचे जिल्हा प्रमुख व तालुका संघटक शुभम पाटील नारे यांना विनाकारण अटक केल्याचा आरोप प्रहार पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

Donald Trump vs elon Musk : मस्क यांनी व्यक्त केली खंत; पोस्ट करत सांगितले वाद खुपचं लांबला

तसेच अरविंद पाटील, मनोज पाटील, कुलदीप पाटील (वसु), जीवन खवले, बिट्टू वाकोडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काळे झेंडे दाखविण्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या संदर्भात प्रहार, किसान ब्रिगेडचे कार्यकर्ते जिल्हाभरात स्थानबद्ध करण्यात आल्याचेही वृत्त आहे. आंदोलनाला गती मिळू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा हे सभास्थळी आंदोलन करण्याची शक्यता होती.

Narayan Rane : मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो, राणेंनीच टोचले मुलाचे कान, मुख्यमंत्र्यांनीही खडसावले!

त्यामुळे त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले आहे. आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी काय करते मात्र मैदानापासून ते आंदोलन करतीलच असा विश्वास राजेश मिश्रा यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने राजकारण पेटले आहे. आता हा संघर्ष कोणत्या वळणावर जाणार याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे