व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bacchu kadu : “उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना झापलं, फक्त मारायचंच बाकी होतं”

Bacchu kadu : “उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना झापलं, फक्त मारायचंच बाकी होतं”

bacchu-kadu-claim-on-uddhav-thackeray-sanjay-raut-after-sachin-ahir-joins-shinde-shiv-sena : बच्चू कडूंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Mumbai : शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात सचिन अहिर यांच्या प्रवेशानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या घडामोडीनंतर शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत नाराजीबाबत मोठा दावा करत नवी राजकीय चर्चा सुरू केली आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे पक्षात मोठी नाराजी असून उद्धव ठाकरे यांनी त्यांना चांगलेच झापले होते, “फक्त मारायचंच बाकी राहिलं होतं,” असा दावा बच्चू कडू यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अलीकडील काळात ठाकरे गटातील सहा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आता माजी मंत्री सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी नियुक्ती झाल्याने ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

In the infant trafficking case : चंद्रपूर बाळ विक्री प्रकरणी चंद्रपुरातील दोन महिलांना अटक; आमदार जोरगेवार समर्थकांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी संजय राऊत यांच्यावर थेट निशाणा साधला. “सचिन अहिर आमच्याकडे आले आहेत, त्यामुळे त्यांच्या संपर्कातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही भविष्यात आमच्यासोबत येऊ शकतात. आम्ही त्यांचे स्वागत करू,” असे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातून केंद्र सरकारला बळकट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावाही त्यांनी केला.

संजय राऊत यांच्या सातत्याने होणाऱ्या वक्तव्यांमुळे ठाकरे गटातील अनेक नेते नाराज असल्याचा दावा करत बच्चू कडू म्हणाले की, रोज सकाळी माध्यमांसमोर येऊन होणारी बेताल विधाने आणि इतर पक्षांवर होणारी टीका यामुळे अनेक नेते अस्वस्थ झाले आहेत. याच कारणामुळे पक्षातून बाहेर पडण्याचे प्रमाण वाढल्याचा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातील कथित मतभेदांबाबत बोलताना बच्चू कडू यांनी “उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना जोरदार शब्दांत सुनावले. फक्त मारायचंच बाकी राहिलं होतं,” असा दावा केला. मात्र या दाव्याबाबत ठाकरे गटाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

https://sattavedh.com/dr-nitin-raut-neglect-of-north-nagpur-in-the-chief-ministers-own-city-dr-nitin-raut-launches-scathing-attack-on-the-governmen

राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता बच्चू कडू यांनी सावध भूमिका घेतली. हा विषय केंद्रीय नेतृत्वाच्या पातळीवरील असल्याचे सांगत त्यावर अधिक भाष्य करणे टाळले. तसेच मंत्रीपद मिळाले तर तो महाराष्ट्राचाच सन्मान असेल आणि महायुतीमध्ये कोणतीही नाराजी नसून पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जनतेच्या मदतीला धावून जाण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या असून त्या सूचनांचे पालन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. संकटग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Jal jeevan mission : “सात वर्षांनंतरही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी न्यायालयात का यावे लागते?”

याशिवाय शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणावर बोलताना बच्चू कडू यांनी कठोर भूमिका मांडली. पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच सैन्य भरतीप्रमाणे महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा विचार सरकारने करावा, अशीही त्यांनी मागणी केली.

दरम्यान, सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर ठाकरे गटातील अंतर्गत घडामोडी आणि बच्चू कडू यांच्या दाव्यांमुळे राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे नवे पर्व सुरू झाले असून या प्रकरणावर पुढे कोणती राजकीय प्रतिक्रिया उमटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

__

error: Content is protected !!