Internal dispute in Akola Congress over appointment of office bearers : स्थानिक निवडणुका तोंडावर असताना अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Akola स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून येत आहेत. जिल्ह्यातील तालुका अध्यक्षांच्या नियुक्तीवरून गुरुवारी काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आणि जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या वादामुळे जिल्हा काँग्रेस कार्यालयात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
काँग्रेसतर्फे आयोजित मशाल रॅली रद्द झाल्यानंतर स्वराज्य भवनातील जिल्हा काँग्रेस कार्यालयात आमदार पठाण व काही पदाधिकाऱ्यांमध्ये अनौपचारिक चर्चा सुरू होती. यावेळी बार्शीटाकळी तालुकाध्यक्षपदाच्या नियुक्तीचा विषय निघाला. आमदार पठाण यांनी या नियुक्तीबाबत जिल्हाध्यक्ष अमानकर यांना विचारणा केली असता, त्यांनी टाळाटाळीचे उत्तर दिले. त्यावर आमदार पठाण चिडले आणि त्यांनी आवाज चढवत थेट आरोपच केला.
Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, राज्यातील अनेक नेते मुख्यमंत्र्यांना भेटतात, यात वेगळं काय?
“मला अल्पसंख्याक मतदारांपुढे भाषणासाठी पुढे करतात, पण जेव्हा अल्पसंख्याक समाजातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते, तेव्हा मला विश्वासात घेतले जात नाही. हे योग्य आहे का?” असा संतप्त सवाल आमदार पठाण यांनी उपस्थित केला. या क्षणी दोघांमध्ये वाद अधिक तीव्र झाला. आमदार पठाण यांनी जिल्हाध्यक्षांना थेट सुनावल्याने वातावरण तापले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
Chhatrapati Sambhaji Raje : तर महाराष्ट्रातही पंजाबसारखी स्थिती होईल
काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली, मात्र या घटनेची चर्चा सध्या काँग्रेसच्या वर्तुळात चांगलीच रंगली आहे. अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नुकतीच तालुकास्तरावरील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अकोला व बार्शीटाकळी तालुका अध्यक्षपदी अल्पसंख्याक समाजातील नेत्यांना संधी देण्यात आली आहे. यावरून आमदार व काँग्रेस जिल्हाध्यक्ष मध्ये खडाजंगी झाली.