How can state president Chandrashekhar Bawankule and working president Ravindra Chavan be ignorant in a disciplined party like BJP : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाणच अनभिज्ञ
Nagpur : भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. शिस्तबद्धतेसाठी हा पक्ष ओळखला जातो आणि या पक्षात तशी शिस्त बघायलाही मिळते. अगदी विरोधकही यांच्या शिस्तीचे कौतुक करतात. अंतर्गत वाद असले तरी ते चव्हाट्यावर येत नाहीत. बंदद्वार ते मिटवले जातात. काँग्रेसच्या एका ज्येष्ट नेत्याने केलेल्या वक्तव्यानुसार ‘ते एका खोलीमध्ये ठोसाठोसी करतात’. पण आज थोडं विपरित घडलं. त्यामुळे हे खरं आहे की, यामध्ये ‘कुछ तो गडबड है..’, असे जनसामान्यांनाच नव्हे तर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही वाटू लागलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून नाशिकच्या राजकारणात आज (ता. १७ जून) रणकंदन माजले. सुधाकर बडगुजर यांनी भाजप प्रवेशाची पूर्ण तयारी केली. सहकारी नेते आणि कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली. पण ही बाब खुद्द पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनाच माहिती नाही. तसे वक्तव्यही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नागपुरात केले. वादग्रस्त असलेला पक्षप्रवेश होतो आहे अन् प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांनाच याची माहिती नसावी आणि तेसुद्धा भाजपसारख्या पक्षात, यावर ‘ये बात कुछ हजम नही हुई..’, अशाच प्रतिक्रिया राज्यभर उमटत आहेत.
BJP expansion : अशांना धुवून, घासून आणि पुसून घेण्याची अगतिकता काय?
तीन पिढ्यांपासून पक्षासाठी भरीव योगदान देणाऱ्या नाशिकच्या हिरे परिवारातील आमदार सिमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाला कडाडून विरोध केला. ही बाब त्यांनी पक्षाच्या शिर्षस्थ नेत्यांपुढे मांडली. त्यानंतर बडगुजर यांच्या प्रवेशाला स्थगिती दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फढणवीस यांनी स्वतः आमदार हिरे यांना सांगितले. अगदी गेल्या आठ दिवसांपर्यंत ही स्थगिती कायम होती. पण अचानक आज बडगुजर यांनी प्रवेशाची तयारी केली अन् नाशिकहून मुंबईकडे कूच केली. हे इतक्या सहजासहजी घडले असेल, असे वाटत नाही. यामागे नक्कीच काहीतरी गहिरं राजकारण शिजलं असावं.
Uddhav Balasaheb Thackeray : चिखलीत नगरपालिकेच्या विरोधात ‘डफडे बजाव’ आंदोलन!
सुधाकर बडगुजर यांना पक्षात घ्यायचे आणि सिमा हिरेंनाही दुखवायचे नाही, असे पक्षाने ठरवले असेल. आज बडगुजर यांचे प्रवेशासाठी मुंबईला निघणे. इकडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्याची माहिती नसणे. तसे त्यांनी जाहिरपणे माध्यमांना सांगणे. हा सर्व भाजपच्या रणनितीचाच एक भाग असावा, असे राजकीय जाणकारांना वाटते. तिकडे बडगुजरांना प्रवेश देता-देता इकडे सिमा हिरेंचीही समजूत काढणे, यासाठी पक्षाने काहीतरी नियोजन नक्कीच केले असेल. नाही तर इतकी मोठी घडामोड हेत असताना खुद्द प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटतम सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांना त्याची माहितीही नसणे, हे शक्य वाटत नाही. इतर पक्षांचे समजले जाऊ शकते. पण भाजपमध्ये हे शक्य वाटत नाही. बाकी पुढील घडामोडींनंतर याचा खुलासा होईलच.