Congress criticizes BJP government over Hindi compulsion : पर्यायाचा देखावा आणि हिंदी लादण्याचा पूर्वनियोजित कट
Nagpur : माय मराठीवरचा अन्याय काही केल्या थांबत नाहिये. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले होते. त्यावेळी महाविकास आघाडी, मनसे, मराठी भाषेचे अभ्यासक आणि जवळपास सर्वांनीच हिंदी भाषेच्या सक्तीचा विरोध केला होता. तेव्हा शिक्षणात हिंदी भाषा ही पर्यायी असेल, हिंदीची सक्ती केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. पण प्रत्यक्षात तसे घडलेले दिसत नाहीये.
हिंदी भाषेच्या सक्तीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी X वर जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये ते म्हणतात, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केला. तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली, असं सांगून जनतेची फसवणूक केली गेली. पण सरकारचा जीआर काय सांगतो? हिंदी हीच सक्तीची तिसरी भाषा असणार, इतर कोणतीही भाषा शिकायची असल्यास किमान २० विद्यार्थ्यांची अट. म्हणजे पर्याचा देखावा आणि हिंदी लादण्याचा ठरवलेला कट.
Sanjay sirsat Vs Imtiaz Jalil : संजय शिरसाट, इम्तियाज जलील यांच्या समर्थकात तुंबळ हाणामारी
हा भाजपचा महाराष्ट्रद्रोही अजेंडाच असून हे मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणूस यांना संपवण्याचे कारस्थान आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची निष्ठा ही महाराष्ट्राशी, मराठी माणसाशी नाही, तर दिल्लीश्वरांशी आहे, हेच यातून स्पष्ट होते. वारंवार बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेणाऱ्या शिंदे गटाकडेच शिक्षण खातं असून त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. तशाच प्रकारे मराठीचा खून पाडण्याची सुपारी घेतली आहे.
Kolhapur : घरी जाता यावे म्हणून… अल्पवयीन सहकाऱ्याने विद्यार्थ्याला शॉक देऊन मारले!
अजित पवार सत्तेसाठी इतके लाचार झाले आहेत की त्यांना तर महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस जगले काय अन् मेले काय, याच्याशी काही देणे घेणे नाही. फक्त आपल्याला अर्थ खातं मिळावं, हेच अजित पवारांचे धोरण आहे. संघ आणि भाजपचा हा ‘एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृती’ चा अजेंडा महाराष्ट्राच्या मुळावर उठला असून तो झुगारून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.’