व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Beggar Mla : ३३८३ कोटींच्या संपत्तीचा आमदार चक्क भिकारी बनला; घाटकोपरच्या रस्त्यावर...

Beggar Mla : ३३८३ कोटींच्या संपत्तीचा आमदार चक्क भिकारी बनला; घाटकोपरच्या रस्त्यावर मागितली भीक, कारण आलं समोर!

bjp-mla-parag-shah-became-beggar-ghatkopar-jain-guru-order : लोकांनी ओळखलंच नाही! अखेर समोर आलं धक्कादायक कारण

Mumbai : कोट्यवधींची संपत्ती, आलिशान गाड्या, सुरक्षाव्यवस्था आणि राजकीय ओळख… महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक असलेली व्यक्ती अचानक सगळं काही बाजूला ठेवून रस्त्यावर आली तर? एवढंच नाही, तर त्याच व्यक्तीने अंगावर साधे कपडे चढवले, आपली ओळख पूर्णपणे लपवली आणि चक्क रस्त्यावर भीक मागत काही तास घालवले. विशेष म्हणजे, आजूबाजूला असलेल्या एकाही व्यक्तीला हा भिकारी कोण आहे, याचा अंदाज आला नाही.

घाटकोपरच्या रस्त्यांवर घडलेल्या या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. सुरुवातीला हा व्हिडीओ पाहणाऱ्यांनाही नेमकं काय सुरू आहे, याचा अंदाज येत नव्हता. मात्र, या अनोख्या प्रयोगामागची कहाणी समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

या संपूर्ण प्रसंगाच्या केंद्रस्थानी आहेत घाटकोपर पूर्वचे भाजप आमदार पराग शाह. शाह यांनी आपली महागडी जीवनशैली, सुरक्षाव्यवस्था आणि राजकीय ओळख काही काळासाठी पूर्णपणे बाजूला ठेवली. चेहऱ्यावर मेकअप करून त्यांनी स्वतःचा वेष बदलला आणि सामान्य भिकाऱ्याप्रमाणे घाटकोपरच्या रस्त्यावर फिरायला सुरुवात केली. ते रस्त्याच्या कडेला बसले, लोकांकडे मदत मागितली आणि मिळालेल्या अन्नातून जेवणही केले.

Women Asia Cup 2026 : ट्रॉफी स्वीकारण्यास नकार, दुबईत मध्यरात्री रंगला हायव्होल्टेज ड्रामा !

सगळ्यात विशेष म्हणजे, ज्या भागाचे ते आमदार आहेत, त्याच परिसरात ते अशा अवस्थेत फिरत होते. मात्र, वेष इतका बदललेला होता की त्यांच्या आसपासच्या लोकांनाही ते पराग शाह असल्याचे कळले नाही. पण एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक असलेला आमदार अचानक भिकारी का बनला? यामागे कोणताही राजकीय स्टंट नसून जैन धर्मगुरूंचा सल्ला असल्याचे सांगितले जात आहे. सध्या जैन समाजाचा चातुर्मास सुरू आहे. पराग शाह यांचे गुरु नम्रमुनी यांनी त्यांना एक दिवस भिकाऱ्याचे जीवन प्रत्यक्ष अनुभवण्याचा सल्ला दिला. या सल्ल्याचे पालन करत शाह यांनी आपली ओळख आणि ऐशोआराम बाजूला ठेवून हा अनुभव घेतला.

Manoj jarange : मनोज जरांगेंनी तारीख बदलली; आता १९ सप्टेंबरला मुंबईत धडकणार

या प्रयोगानंतर त्यांनी आपल्या गुरुंसमोर आणि इतरांसमोर या अनुभवाबद्दल सांगितले. विशेष म्हणजे, ज्या लोकांमध्ये ते भिकाऱ्याच्या वेषात गेले होते, त्यांच्याकडे नंतर मेकअप काढून ते पुन्हा गेले आणि त्यांच्याशी संवाद साधला. त्यामुळे या संपूर्ण प्रसंगाला आणखी वेगळा आयाम मिळाला. ज्याला घाटकोपरच्या रस्त्यावर सामान्य भिकारी समजून लोकांनी पाहिले, तो दुसरा-तिसरा कोणी नसून तब्बल हजारो कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला आमदार पराग शाह होता.
२०२४च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पराग शाह यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात ३३८३ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जाहीर केली होती. त्यामुळे ते महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले होते. रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांचा व्यवसाय असून, यापूर्वी त्यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक म्हणूनही काम केले आहे. एका बाजूला हजारो कोटींची संपत्ती आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावर भिकाऱ्याच्या रूपात काही तासांचा अनुभव… पराग शाह यांच्या या अनोख्या प्रयोगाचीच सध्या राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
_____

error: Content is protected !!