Breaking

MLA Vinod Agrawal : डॉ. एस. शिवबाला यांची थेट वनमंत्र्यांकडे तक्रार !

Dr. S. Shivbala’s complaint directly to Forest Minister Ganesh Naik : गणेश नाईक यांनी दिले चौकशीचे आदेश

Nagpur : सन २०२२ मध्ये काही महामंडळांचे अध्यक्षपद राज्य सरकारने रद्द केले. यामध्ये महाराष्ट्र जैवविविधता महामंडळाचाही समावेश आहे. सुमारे १० वर्षांपूर्वी राज्य सरकारने जैवविविधता मंडळाची स्थापना केली होती. स्थापनेपासून हे महामंडळ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आता मंडळाचे सदस्य सचिव आणि भारतीय वनसेवेतील अधिकारी डॉ. एस. शिवबाला यांची थेट वनमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

आता डॉ. एस. शिवबाला यांच्या कारवाई होणे निश्चित मानले जात आहे. कारण गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी या मंडळातील कारभारावर ताशेरे ओढले आहेत. महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या कार्यालयाच्या आत व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ध्वनी यंत्र लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे कार्यायात कोण काय करत आहे आणि काय बोलत आहे, यावर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे सर्वच कर्मचारी आणि त्यातल्या त्यात महिला कर्मचारी अस्वस्थ आहेत. त्याचा थेट परिणाम कामावर होतो आहे. आमदार अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Sudhir Mungantiwar : ‘ठेंगणें’नी ठेवला विनंतीचा मान, अन् मुनगंटीवारांनी केले त्यांना ‘आभाळ ठेंगणे’

मंडळाच्या शासकीय योजनेसाठी आलेला निधी अखर्चित ठेऊन तो परस्पर शासनाला परत करण्यात आला आहे. ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर मंडळाचे काम ठप्प पडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. निधी परत करण्यासाठी मंडळाच्या नियमांनुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक यांची महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या अध्यक्ष या नात्याने परवानगी घेणे गरजेचे आहे. मात्र हा निधी परत करताना कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे.

Devendra Fadnavis : फाल्कन 2000 जेटसची आता नागपुरात निर्मिती

गेल्या वर्षी मंडळासाठी जवळपास ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सदस्य सचिवांच्या निष्काळजीपणामुळे यावर्षी हा निधी केवळ ११ कोटींचाच राहिला आहे. विद्यमान सदस्य सचिव जैवविविधता मंडळात आणखी काही काळ राहिल्यास या मंडळाच्या उद्देशालाही तडा जाण्याची भीती आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.