Policy should be prepared as per the instructions of CM Devendra Fadnavis : सार्वजनिक बांधकाम विभागाने निकडीसाठीचे धोरण आणि एसओपी तयार करावी
Mumbai : नागपूर आणि अमरावती विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रलंबित प्रश्नांवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी गावांना जोडण्यासोबत राज्याच्या आर्थिक विकासाला चालणा देणाऱ्या रस्त्यांच्या निर्मितीला प्राधान्य देण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, सचिव संजय दशपेते यांच्यासह विभागाचे अधिकारी तसेच अमरावती आणि नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दूरदृष्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते. यावेळी महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की, राज्यातील रस्त्यांची कामे करताना त्यांची निकड लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने मानक कार्यप्रणाली SOP निश्चित करावी. हेच निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत, असे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या निकडीसाठीचे धोरण आणि SOP तयार करून जोडल्या जाणाऱ्या गावांचे जीवनमान उंचावले जाईल, असे रस्ते बनवण्यासाठी व्हिजन ठेऊन काम करावे. यासाठी विभागाने आपल्या सुस्पष्ट अभिप्रायांसह योजनाबद्ध रितीने अत्यावश्यक कामे प्रस्तावित करावी, असेही महसूल मंत्री बावनकुळे यांनी या बैठकीत सांगितले.
Dangerous roads : कमकुवत पुलांप्रमाणे झुडपेही ठरताहेत धोकादायक !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गावांना जोडण्यासोबतच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याचसोबत पर्यटन वृद्धीसाठी आवश्यक असलेल्या तसेच व्यापार वृद्धीच्या दृष्टीनेही बंदरांशी जोडणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असे शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितले. अमरावती विभागातील अचलपूर-बडनेरा-यवतमाळ या रस्त्यासाठी हायब्रीड अन्युयिटी मॉडेलअंतर्गत प्रस्ताव पाठवण्याची सुचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली.