Breaking

Devendra Fadanvis : खाशाबा जाधव यांच्यासारखे पुन्हा मिळवा ऑलिम्पिकमध्ये स्थान !

Get a place in the Olympics again like Khashaba Jadhav : सर्व महानायक कुस्ती खेळणारे, ही प्राचिन परंपरा

Nagpur : महाराष्ट्र केसरी जिंकल्यावर महाराष्ट्रातील खेळाडुंना असं वाटतं की, आपण सगळंच जिंकलो आहे. पण फक्त यावर समाधान न मानता त्यापुढे खेळण्याची गरज नाही, हा विचार बदलला पाहिजे. महाराष्ट्र केसरीने ऑलिम्पिकमध्ये जिंकण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अगदी रामायण आणि महाभारतातही कुस्तीचा उल्लेख आहे. सर्व महानायक कुस्ती खेळणारे आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नागपुरात कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन काल (ता. २१ जून) मुख्यमंत्री फडणवीस यांच्य़ा हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, देशातील २५ राज्यांतून कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. आता सर्वच खेळांमध्ये महाराष्ट्र पुढे जात आहे. गेल्या तीन वर्षांत खेलो इंडिया असो की अन्य खेळ सर्वाधिक मेडल महाराष्ट्राच्या खेळाडुंनी मिळवले आहेत. ज्युनिअर आणि सिनिअर खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत.

CM Devendra Fadnavis : अकोला विमानतळ विस्तारीकरणासाठी विशेष बैठक

आंतरराष्ट्रीय स्तरावर लहान खेळाजुंना मेडल्स मिळत आहेत. पण ते सिनिअर खेळाडुंच्या बाबतीत होताना दिसत नाही. महाराष्ट्राचे अध्यक्ष रामदास दडस यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकार कुस्तीसाठी सर्व स्तरांवर आर्थिक मदत द्यायला तयार आहे. त्यामुळे खाशाबा जाधव प्रमाणे पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळाले पाहिजे. आता मॅटवर कुस्ती खेळली जात असल्याने आपला दबदबा थोडा कमी झाला असला तरी आपले खेळाडू तयार होत आहेत. आणखी चांगले खेळाडू तयार व्हावेत, यासाठी पुढील काळात आणखी प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.