Fathers brutal act on making daughter doctor, killed with staunts : मुलीला डॉक्टर करायचा अट्टाहास, पित्याचे क्रूर कृत्य, जात्याच्या खुंट्याने मारले
Sangli : मुलीला डॉक्टर करण्याच्या स्वप्नाने पछाडलेल्या एका मुख्याध्यापकाने, नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून, पोटच्या पोरीला जात्याच्या दांडक्याने बेदम मारहाण केली. या घटनेत त्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगली किल्ल्यातून समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संबंधित पित्याला अटक करण्यात आली आहे
बारावीत शिकणाऱ्या मुलीला नीट संबंधीच्या चाचणी परीक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून माध्यमिक शाळेत मुख्यध्यापक असणाऱ्या पित्याने पोटच्या मुलीला लाकडी खुंट्यानं बेदम मारहाण केली. सांगलीतील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धोंडीराम भोसले या पित्यास अटक करण्यात आली आहे.
Iran- Israe War : युद्धामुळे पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दराचा भडका उडण्याचा धोका !
बारावीत शिकणाऱ्या साधनाला नीट परीक्षेच्या चाचणी परीक्षेत कमी गुण का मिळाले? असे विचारात माध्यमिक शिक्षण संस्थेत मुख्याध्यपक असलेल्या पित्याने मुलीला घरातच लाकडी खुंट्याने मारहाण केली .या मारहाणीतच मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथे साधना भोसले ही विज्ञान शाखेत शिकत होती. नेलकरंजी गावातच खाजगी शिक्षण संस्थेत वडील धोंडीराम भोसले हे मुख्यध्यापक आहेत .बारावीच्या चाचणी परीक्षेत साधनाला कमी गुण मिळाले. हे कळताच धोंडीराम भोसले प्रचंड संतापले.
चाचणी परीक्षेत कमी गुण कसे पडले असा जाब विचारत धोंडीराम भोसले यांनी रागाच्या भरात साधनाला लाकडी खुंट्याने मारहाण केली. या मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली. यातच तिचा मृत्यू झाला. याबाबत मुलीची आई प्रीती भोसले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर रविवारी वडील धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली आहे.
साधना भोसले ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. तिचा नीटच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले होते. त्यामुळे तिचे वडील मुख्याध्यक धोंडीराम भोसले हे संतापले होते. साधना ही आपटपाडीमधील विद्यालयात राहत होती. दोन दिवसांपूर्वी ती घरी नेलकरंजी येथे गेली होती. त्यावेळी नीट परिक्षेच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तिला मुख्यापध्यापक पित्याने जात्याच्या लाकडी खुंट्याने रात्री बेदम मारहाण केली.
Obscene behavior : फिटनेस सर्टिफिकेटसाठी महिलेला नको तिथे ‘ टच’
या मारहाणीची ती गंभीर जखमी झाली. परंतु त्यानंतर मुख्याध्यापक तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता शाळेत निघून गेले. साधनाचे वडील घरी आल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. साधना ही हुशार होती. तिला दहावीमध्ये 95 टक्के गुण मिळाले होती. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. परंतु केवळ नीटच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मुख्याध्यापक वडिलांकडूनच झालेल्या मारहाणीत तिचा हकनाक बळी गेला.