The vote of new voters will be decisive : विधानसभेनंतर अमरावती जिल्ह्यात ४४ हजार नवमतदारांची नोंद; युवकांचे प्रमाण सर्वाधिक
Amravati जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली आहे. आगामी दीड महिन्यांत महापालिकेसह नगर परिषदा, नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. याआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात नव्याने ४३,७६९ मतदारांची भर पडली आहे. त्यात १८ ते २९ वयोगटातील २९,३६६ युवकांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांत युवाशक्ती निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी २९ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्ह्यात एकूण २५,४६,४५८ मतदार होते. आता २० जून २०२५ रोजी ही संख्या २५,९०,२२७ वर पोहोचली आहे. पुढील दोन महिन्यांतही मतदार नोंदणी सुरूच राहणार असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा अकोला जिल्ह्याला किती फायदा?
सध्या जिल्ह्यात प्रभाग रचना सुरू असून, त्यानंतर आरक्षण सोडत व मतदार यादी अंतिम होईल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार, दिवाळीपूर्वी महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या तर दिवाळीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होऊ शकतात.
मतदारवाढ व वयोगटवार चित्र
विधानसभेनंतर १८–१९ वयोगटात ७४०४, २०–२९ गटात २१,९६२, ३०–३९ गटात ७८८४, ४०–४९ मध्ये ३५३६, ५०–५९ मध्ये २१०५, ६०–६९ मध्ये १०१३ आणि ७०–७९ वयोगटात ३६७ मतदारांची भर पडली आहे. त्याचवेळी ८० वर्षांवरील वयोगटात मतदारांची संख्या घटली आहे.
Crime news : नीट चाचणी परीक्षेत कमी गुण! मुख्याध्यापकान लेकीला बेदम मारून संपवलं
मतदारसंघनिहाय एकूण मतदारसंख्या
अमरावती : ३,८२,९१७
बडनेरा : ३,७२,७१२
धामणगाव : ३,२०,२११
दर्यापूर : ३,११,७८५
मेळघाट : ३,०९,४६६
तिवसा : ३,००,७८१
अचलपूर : २,९६,६८८
मोर्शी : २,९५,६६७
एकूण मतदारसंख्या : २५,९०,२२७
सर्वाधिक मतदार २०–५० वयोगटात
सद्यस्थितीत सर्वाधिक मतदार २०–५० वयोगटात आहेत. त्यात १८–१९ वयोगटात ५४,३२४, २०–२९ मध्ये ५,०५,७१४, ३०–३९ मध्ये ५,७२,९०५ व ४०–४९ वयोगटात ५,२९,५६५ मतदार आहेत. याशिवाय वयोवृद्ध १०० वर्षांवरील ११ मतदार अद्याप नोंदणीत आहेत.