Strict action will be taken, Devendra Fadnavis orders : अन्यथा कठोर कारवाईचा देवेंद्र फडणवीसांचा आदेश
Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या कार्यालयातील स्वीय सहायक आणि ओएसडींच्या नियुक्ती संदर्भात कठोर भूमिका घेतली आहे. त्यानुसार मंत्र्यांच्या खासगी सचिवांना त्यांच्या मूळ विभागात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महायुतीमध्ये काहीशी नाराजी आहे. मु्ख्यमंत्री कार्यालयाकडून मंत्र्यांच्या खासगी सचिवांना त्यांच्या मूळ विभागात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वीच संबंधित स्वीय सहाय्यकांना हे आदेश तोंडी देण्यात आले होते. मात्र, त्याच्याकडे मंत्री आणि त्यांच्या पीए यांनी कानाडोळा केला होता. मात्र, आता लेखी आदेश देण्यात आले आहेत. यामुळे महायुती सरकारच्या मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारमधील सात मंत्र्यांना ओएसडी आणि पीए नियुक्त करण्यासाठीची परवानगी नाकारली होती. हा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. परंतु, आता मुख्यमंत्री
फडणवीस यांच्या कार्यालयाकडून पुन्हा एका मंत्र्यांचे पीए म्हणून कार्यरत असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश मिळाल्यानंतरही मूळ विभागात हजर न झाल्यास संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा अकोला जिल्ह्याला किती फायदा?
या आदेशामुळे महायुतीमधील मंत्र्यांची एकच तारांबळ उडाली आहे. स्वीय सहाय्यक आणि ओएसडी हे मंत्र्यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासातील असतात. त्यामुळे मंत्री या पदावरील अधिकाऱ्यांची निवड करताना आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी लागावी, यासाठी आग्रही असतात. परंतु, फडणवीस हे पीए आणि ओएसडींची नेमणूक करताना त्यांचे चारित्र्य निष्कलंक असावे, यासाठी आग्रही आहेत. तसेच काही अधिकारी एकाच विभागात अनेक वर्षे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
यामुळे त्यांची एकाधिकारशाही निर्माण होण्याचा आणि भ्रष्टाचाराचा धोका असू शकतो. यामुळे वर्षानुवर्षे एकाच मंत्र्याकडे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना आपल्या मूळ विभागात तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात फडणवीस यांनी आता आणखी कठोर भूमिका घेतली आहे.
Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांनी अबू आझमींची लायकीच काढली !
मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे नाराज सातपैकी पाच मंत्री हे शिंदे गटाचे आहेत. यामध्ये संजय राठोड, गुलाबराव पाटील, उदय सामंत आणि शंभुराज देसाई यांचा समावेश आहे अशी चर्चा आहे. तर राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांचा आणि भाजपच्या एका मंत्र्याचा समावेश आहे. भाजपच्या मंत्र्यांनाही जवळचा सरकारी अधिकारी खासगी सचिव म्हणून हवा आहे.
Devendra Fadanvis : खाशाबा जाधव यांच्यासारखे पुन्हा मिळवा ऑलिम्पिकमध्ये स्थान !
पण देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपचे मंत्र्यांनी चुप्पी साधली आहे. आपल्या खासगी सचिवांना नोटीस आल्यानंतर मंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर चकरा मारायला सुरुवात केली आहे. खासगी सचिवांना आदेश आल्यानंतरही ते मूळ विभागात बेकायदेशीरपणे काम करत राहिले तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. या सगळ्याचे पडसाद आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटू शकतात. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
____