Breaking

Buldhana BJP : भाजप कार्यकर्ता पंकज देशमुख मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशी करा!

Demand for CID inquiry into BJP worker Pankaj Deshmukh’s death : न्याय हक्क जनआंदोलन समितीची मागणी; ३० जूनपर्यंत कार्यवाही न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा

Buldhana जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ता पंकज उत्तमराव देशमुख यांचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी न्याय हक्क जनआंदोलन समितीने केली आहे. ३० जूनपर्यंत कार्यवाही न झाल्यास रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिवंगत देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख, जयश्री शेळके (उद्धवसेना), स्वाती वाकेकर, डॉ. ज्योती खेडेकर, प्रसेनजीत पाटील, वसंतराव भोजने यांच्यासह राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना, बसपा व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Burden of career : पालकांच्या अपेक्षांचं ओझं मुलांना होतय जड!

समितीने पोलिस तपासाबाबत खालील महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले़ देशमुख यांनी गळफास घेतलेला नाही, तर त्यांचे हात मोडलेले होते. अंगावर भाजल्याच्या खुणा असल्याचे निदर्शनास आले. शवविच्छेदनासाठी मृतदेह अकोला येथे का हलविण्यात आला, याबाबत स्पष्टता नाही. पंचनामा करताना कुटुंबातील कुणालाही उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली नाही. शवविच्छेदन अहवाल संदिग्ध आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.

Bacchu Kadu : बच्चू कडूंना उच्च न्यायालयाचा दिलासा!

मृत्यूपूर्वी देशमुख ज्या लोकांसोबत होते, त्यांची चौकशी झालेली नाही. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले का, याबाबतही शंका व्यक्त करण्यात आली. “देशमुख कुटुंबाचा पोलिस तपासावर विश्वास उरलेला नाही. त्यामुळे ही चौकशी सीआयडीकडे दिली जावी. तसेच आगामी अधिवेशनात जिल्ह्यातील आमदारांनी ही बाब विधिमंडळात उपस्थित करावी, अशी आमची अपेक्षा आहे,” असे समितीने स्पष्ट केले. अन्यथा हजारोंच्या संख्येने आंदोलन करण्यात येईल आणि गरज भासल्यास न्यायालयातही दाद मागण्यात येईल, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला.