व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र No Hawkers Zone : ‘नो हॉकर्स झोन’मधील अतिक्रमणांवर सोमवारपासून बुलडोझर!

No Hawkers Zone : ‘नो हॉकर्स झोन’मधील अतिक्रमणांवर सोमवारपासून बुलडोझर!

Bulldozers to roll in on encroachments in ‘No Hawkers Zone’ from Monday : पूर्व सूचनांनंतरही अतिक्रमणे कायम; फलक, घोषणांद्वारे जनजागृती

Akola शहरातील मुख्य रस्ते आणि ‘नो हॉकर्स झोन’मध्ये वाढत चाललेल्या अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. अतिक्रमणे हटविण्याच्या पूर्वीच्या सूचनांनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सोमवारपासून ‘नो हॉकर्स झोन’अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवर अतिक्रमणे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.

दरम्यान, गुरुवारी मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या उपस्थितीत अतिक्रमण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. नगरसेवक सिद्धार्थ उपरवट यांच्यासह सहायक आयुक्त गणेश शहाणे, उपायुक्त विजय पारतवार, शहर अभियंता अजय गुजर, सहायक अतिक्रमण निर्मूलन अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे आणि प्रमोद गायकवाड उपस्थित होते.

शहरातील मुख्य रस्ते आणि ‘नो हॉकर्स झोन’मधील अतिक्रमणांचा सभापती विजय अग्रवाल यांनी ९ सप्टेंबर रोजी आढावा घेतला होता. या बैठकीत काश्मीर लॉजसमोरील रस्त्यावरील अतिक्रमणे हटविणे, शहरातील ‘नो हॉकर्स झोन’मधील अतिक्रमणे पूर्णपणे हटविणे, विविध झोनमध्ये नियमित कारवाई करणे तसेच दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत अतिक्रमणविरोधी पथके कार्यान्वित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांनंतरही अतिक्रमणांची परिस्थिती कायम राहिल्याने सभापती अग्रवाल यांनी विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली.

Amravati Crime : ऐकावं ते लवनलच! मृत युवकाला जिवंत करण्यासाठी जादूटोणा?

सोमवारपासून कठोर कारवाईचे संकेत

‘नो हॉकर्स झोन’मधील रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांना आता कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे संकेत सभापती विजय अग्रवाल यांनी दिले. सोमवारपासून या परिसरात अतिक्रमणे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अतिक्रमण विभागाला दिल्या.

शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना अतिक्रमण विभागाच्या पथकांनी केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाई करावी, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली. प्रशासनाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली.

‘नो हॉकर्स झोन’ची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांना होणारा त्रास आणि सार्वजनिक रस्त्यांवरील अडथळे कमी होण्यास मदत होऊ शकते.

Sanjay Raut Amit Shah : गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानेच धनुष्यबाण शिंदेंना; संजय राऊत यांचा दावा

मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनीही अतिक्रमण निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. ‘नो हॉकर्स झोन’अंतर्गत येणाऱ्या सर्व रस्त्यांवर स्पष्ट सूचना फलक लावण्यात यावेत. तसेच या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याबाबत ध्वनिक्षेपकाद्वारे घोषणा करून नागरिक व व्यावसायिकांना पूर्वसूचना देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

ताकीद देऊनही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे न हटवल्यास नियमानुसार ती जागेवरच हटविण्याची अथवा निष्कासित करण्याची कारवाई करावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!