Breaking

Gram Panchayat : बुलढाण्यात १३० ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड तपासले!

Records of 130 Gram Panchayats checked : ८७० ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणी मोहिमेला जिल्ह्यात सुरूवात

Buldhana : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या पुढाकाराने ८७० ग्रामपंचायतींच्या दप्तर तपासणी मोहिमेला २४ जूनपासून औपचारिक सुरुवात झाली.

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात १३० ग्रामपंचायतींनी आपले रेकॉर्ड सादर केले असून, तपासणीसाठी प्रत्येक तालुक्यातून निवडलेल्या ग्रामपंचायतींचे दस्तऐवज श्री शिवाजी सभागृहात सादर करण्यात आले. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतील ग्रामपंचायत अधिकारी नियोजित वेळेत रेकॉर्डसह उपस्थित राहिले.

PWD Buldhana : चिखलीतील ब्रिटिशकालीन विश्रामगृह रातोरात पाडले!

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी विस्तार अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दप्तर तपासणी कशी करावी, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर रेकॉर्ड तपासणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. प्रत्येक पंचायत समितीमधून निवडलेल्या ग्रामपंचायतींची तपासणी प्रत्येकी दोन तज्ज्ञ विस्तार अधिकारी करत असून, तपासणीचे काम सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरू राहिले.

Local Body Elections : प्रभाग रचनेत सत्ताधारी पक्षातील नेत्यांचा हस्तक्षेप

यापूर्वी ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी प्रामुख्याने पंचायत समिती पातळीवर होत असे. मात्र, गुलाबराव खरात यांनी कारभाराची सूत्रे स्वीकारल्यापासून थेट जिल्हा परिषद स्तरावरच तपासणी घेण्याचा पहिल्यांदाच निर्णय घेतला, हे या मोहिमेचे वैशिष्ट्य मानले जात आहे.या उपक्रमावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख अधिकारी आशिष पवार, सहायक गटविकास अधिकारी तायडे यांचीही उपस्थिती होती.