Breaking

Criem News: शॉकिंग! ग्राहकांची बिले नगरपालिकेच्या नावावर टाकत गंडा

engineers suspended for embezzling Rs 39 lakh from electricity bills : वीज बिलांच्या पैशातून 39 लाखांचा अपहार, 2 अभियंते निलंबित

Parali : सर्वसामान्य ग्राहकांचे विज बिल, नगरपालिकेच्या नावावर टाकून 39 लाख रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना, बीड जिल्ह्यातील परळी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर महावितरण ने अखेर चौकशी आणती दोन अभियंत्यांना निलंबित करण्याची कारवाई केली आहे.
बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणाने गाजत आहे. बीड मधील राजकारण, प्रशासन, गुंडगिरी, माफियागिरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गोष्टी समोर आल्यामुळे हा जिल्हा कायम चर्चेत येतो. याच जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा परळीतून एक ‘ शॉकिंग’ माहिती पुढे आली आहे. सामान्य विज ग्राहकांचे बिल नगरपालिकेच्या बिलात मिसळून 39 लाख रुपयाचा अपहार झाल्याची बाब समोर आली.

Sudhir Mungantiwar : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या पहिल्या टप्प्यातील 94 कोटीचे वितरण सुरू

नगरपरिषदेतील हा विज बिल घोटाळा चर्चेचा विषय झाला. काहीतरी गडबड आहे अशी शंका संबंधितांना होती. पण यावर बोलायला कोणीही तयार नव्हते या प्रकरणावर अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली. त्यावेळी घोटाळ्याचा भयंकर प्रकार चर्चेत आला. शेवटी हा विषय गाजू लागल्या नंतर महावितरणने चौकशी करून दोन अभियंतांवर निलंबनाची कारवाई केली.

Crime News : आश्रमात घुसून कीर्तनकार महिलेचा निर्घुण खून !

 

कोणाच्याही लक्षात येऊ नये अशा पद्धतीने सुरू असलेला अपहाराचा हा प्रकार, केव्हापासून सुरू होता. आणि नेमकी किती लूट यात झाली? सोबतच यात आणखी कोण कोण सहभागी आहेत? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. सध्या तरी महावितरणने दोन अभियंतांवर कारवाई करत या विषयाला विराम दिला आहे.

______