Breaking

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा दावा, महाराष्ट्र-गुजरातमधील नागरी बँकांचे विकासात मोठे योगदान

urban banks in Maharashtra-Gujarat have major contribution to the development : वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्य महोत्सव सोहळ्याला हजेरी

Nagpur नागरी सहकारी बँकांचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्र व गुजरात राज्यात असून या बँकांनी राज्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. यासोबतच सर्वसामान्य नागरिकांमध्ये बँकिंग व्यवहाराबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यातही नागरी सहकारी बँकांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार सागर मेघे, पगारिया ग्रुपचे अध्यक्ष उज्वल पगारिया, वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष अनिल पारख, उपाध्यक्ष अश्विन शहा व्यासपीठावर उपस्थित होते.

Devendra Fadnavis : “झूठ बोले …” राहुलजी, तुम्ही कधीपर्यंत हवेत बाण सोडत राहणार?

बहुतांश व्यावसायिक बँका गुंतवणुकीसह इतर बाबींमध्ये अग्रेसर असतात. परंतु देशाच्या आर्थिक विकासासाठी विविध प्राधान्यशील क्षेत्रात करण्यात येणाऱ्या कर्जपुरवठ्यात त्या मागे असतात. वित्तीय संस्थांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. जास्तीत जास्त वित्तीय संस्था स्थापित झालेल्या प्रदेशाची आर्थिक आणि भौतिक प्रगती जोमाने होते. या संस्था प्रगतीच्या मानक आणि विकासाच्या भागीदार ठरतात. या दृष्टीने वर्धमान बँकेने व्यावसायिकता जोपासतानाच कौशल्यपूर्ण कामकाजातून व्यावहारिकता सांभाळत चांगली वित्तीय व्यवस्था उभी केली. कर्जपुरवठ्याला प्राधान्य दिल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून बँकेचीही प्रगती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis : मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांना मूळ विभागात जाण्यासाठी अल्टिमेटम

बँकिंग क्षेत्रात यापूर्वी मोठे बदल झाले तसेच काही नवी धोरणेही लागू झाली. मात्र अशा परिस्थितीतही आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करून सहकारी बँकांनी व्यावसायिकतेचा अवलंब करत नवीन परिस्थितीत स्वतःला स्थापित केले. व्यावसायिक व राष्ट्रीय बँकांनादेखील ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी निर्माण झालेले तंत्रज्ञान स्वीकारण्यास अवधी लागला. मात्र त्या सर्व बाबी अर्बन बँकांनी गतीने स्वीकारून ग्राहककेंद्रित सेवा देण्यासाठी सर्व सुविधांची निर्मिती करण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला आहे, असा दावा त्यांनी केला.