Nagpur benchs observation. youth acquitted:नागपूर खंडपीठाचे निरीक्षण. तरुणाला सोडलं निर्दोष
Nagpur: ‘आय लव्ह यू’ म्हणणं ही भावनांची अभिव्यक्ती आहे. असेम्हणण्याच्या पाठीमागे ‘ लैंगिक हेतू’ असेलचं हे सिद्ध होत नाही. असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नागपूर खंडपीठानं नोंदवलं आहे. 2015 साली एका 35 वर्षीय तरुणानं 17 वर्षीय तरुणीची छेड काढत ‘आय लव्ह यु’ म्हटलं होतं, असा आरोप पीडित तरुणीनं केला होता. त्या तरुणानं लैंगिक हेतूनं तसे म्हटल्याचं सिद्ध झालं नाही. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं तरुणाची निर्दोष मुक्तता केली आहे.
तब्बल दहा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. ‘आय लव्ह यू’ म्हणण्यामागं लैंगिक उद्देश असेलचं असं सिद्ध होतं नसल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांच्या खंडपीठासमोर झाली आहे. 2015 मध्ये तरुणानं 17 वर्षीय मुलीची छेडछाड केल्याच्या आरोपानंतर त्या तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. मात्र ज्या तरुणावर हे आरोप झाले, त्याचा उद्देश त्या मुलीला स्पर्श करणं, बळजबरीनं कपडे उतरवणं किंव्हा अश्लील हावभाव करत त्या तरुणीचा अपमान करण्याचा नव्हता,असंही निरीक्षण नागपूर खंडपीठाने नोंदवले आहे. 35 वर्षीय तरुणाची निर्दोष मुक्तता केली आहे.
Randhir Sawarkar : एमपीएससी उमेदवारांच्या नियुक्तीचा मुद्दा विधानसभेत
2015 साली ही घटना घडलेली होती, त्यावेळी पीडित तरुणीचं वय हे 17 वर्ष होतं. तर ज्या तरुणावर तरुणीनं छेडछाड केल्याचा आरोप केला होता, त्याचं वय 35 इतकं होतं. त्यावेळी तरुणावर ‘पोक्सो’ कायद्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. जिल्हा व सत्र न्यायालयानं तरुणाला 3 वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्या तरुमानं या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. न्यायालयानं जिल्हा न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवला आहे. तब्बल 10 वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर हा गुन्हा रद्द झाला आहे.