Rada in Sunil Tatkare’s press conference, had a sharp reaction ; सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत झालेल्या राड्याचे तीव्र पडसाद
Latur : अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. यात छावा संघटनेचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी सूरज चव्हाण यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत माफी मागितली. मात्र सुरज चव्हाण यांच्यासह काही 12 कार्यकर्त्यां विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. छाया संघटना या मारहाण प्रकारामुळे आक्रमक झाले आहे.चव्हाणांना अटक करावी या मागणीसाठी ठीक ठिकाणी आंदोलन केले जात आहेत. घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत असून अजित पवारांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतले आहे.
सुरत चव्हाण यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांवर अशा बातम्या आल्या की, शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाडगे पाटील यांना आम्ही मारहाण केली. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. कोणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला, तर त्याच्या पाठीशी उभे राहणे मी माझं कर्तव्य समजतो. परंतु, आमच्या नेतृत्त्वाबद्दल असंवैधानिक शब्द वापरला म्हणून आमच्याकडून तशीही कृती झाली. मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी लवकरच विजय घाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करेन, असे सूरज चव्हाण यांनी म्हटले.
Honey Trap Case : हनी ट्रॅप प्रकरणात जामनेर, पहूर येथे धाडी, प्रफुल लोढा अटकेत !
दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे छाया संघटना आक्रमक झाली आहे. घाडगे यांना झालेल्या मारहाणीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी छावाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. चव्हाण यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकारामुळे छाया आणि अजित पवार गटात चांगलाच वाद रंगला आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून चव्हाण यांना भेटीसाठी बोलवले आहे, त्याचबरोबर तटकरेंच्या दौऱ्यापासून दूर राहण्याचा सूचनाही करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या तरी चव्हाण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Maharashtra : अस्वस्थ वर्तमान! महाराष्ट्रात नेमकं चाललय काय?
सुनील तटकरे हे लातूर दौऱ्यावर असताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालत होता. माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याच्या मुद्द्यावरुन जाब विचारला होता. यावेळी छावाच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे बसलेल्या टेबलवर पत्ते उडवले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेचे विजय घाडगे पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली होती.
______








