व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण पोट्टेहो… उद्या मतदान, आज कराळे गुरुजींची राष्ट्रवादी काँग्रेसमधून पडली विकेट!

पोट्टेहो… उद्या मतदान, आज कराळे गुरुजींची राष्ट्रवादी काँग्रेसमधून पडली विकेट!

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी; बंडखोरी पडली महागात

Nagpur : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करणारे आणि शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचे सांगून मतदारांची दिशाभूल करणारे नितेश कराळे (कराळे गुरुजी) यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार) शिस्तभंगाचा बडगा उगारत कराळे गुरुजींची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे.

कराळे गुरुजी यांनी नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी वाजतगाजत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोशल मीडियावर ते प्रचंड लोकप्रिय असले तरी, पक्षाने अधिकृत उमेदवारी नाकारल्यानंतरही त्यांनी माघार घेतली नाही. उलट, “मला शरद पवार साहेबांचाच पाठिंबा आहे,” असे सांगत त्यांनी प्रचार सुरू ठेवल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

दुष्काळाच्या झळांनी शेतकरी हवालदिल; पाणी, वीज, चारा अन् सिंचनासाठी सुधीर मुनगंटीवारांचा प्रशासनाकडे आक्रमक पवित्रा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत सामील असून, आघाडीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देणे आणि विजयासाठी काम करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. मात्र, कराळे गुरुजींनी केलेली बंडखोरी पक्षशिस्तीच्या आणि ध्येयधोरणांच्या विरोधात असल्याने ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी जारी केलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर झालेल्या या कारवाईमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार अभिजित वंजारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पदवीधर निवडणूक ‘फिक्स’, तब्बल २२ हजार बोगस मतदार

विशेष म्हणजे कराळे गुरुजी यांनी यापूर्वीच 2020च्या निवडणुकीतसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी माघारसुद्धा घेतली नव्हती. काँग्रेस नेत्यांनी त्यांची समजूत घातली होती. त्यानंतर त्यांनी अभिजित वंजारी यांना पाठिंबा दर्शवला होता. यावेळी त्यांनी मात्र माघार घेण्यास तसेच पाठिंबा जाहीर करण्यास काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट नकार दिला होता.

error: Content is protected !!