Breaking

Akola Congress : अकोल्यातील तिघांना काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी

Three from Akola given important responsibilities in state Congress : हिदायत पटेल आणि डॉ. झिशान हुसेन यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती; बबनराव चौधरी कार्यकारी सदस्य

Akola महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा मंगळवारी रात्री उशिरा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी केली. या नव्या कार्यकारिणीत अकोल्यातील तीन प्रमुख नेत्यांना स्थान देण्यात आले असून, त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

काँग्रेसतर्फे दोन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे हिदायत पटेल यांची प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पटेल हे अकोल्यातील ज्येष्ठ नेते आहेत. अल्पसंख्याक समाजात त्यांचा विशेष प्रभाव आहे. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक प्रश्नांवर अनेक आंदोलने केली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काँग्रेसची पुन्हा ताकद वाढू शकते, असा पक्ष कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.

Humani worm : हुमणी अळीचा प्रकोप; उद्धव सेनेच्या नेत्या पोहोचल्या शिवारात

अकोला महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते डॉ. झिशान हुसेन यांनाही प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. हुसेन हे डॉक्टर असून सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रीय सहभाग आहे. शहरातील नागरी प्रश्नांवर ते सातत्याने आवाज उठवत आले आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि संघर्षशील नेतृत्वाचा काँग्रेसला आगामी काळात मोठा फायदा होऊ शकतो.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी महानगराध्यक्ष बबनराव चौधरी यांना प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. शहरी तथा ग्रामीण भागात पक्ष बळकट करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.

Rohit Pawar : रोहित पवार म्हणतात, सरकार संवेदनाशून्य, पालकमंत्रीही फिरकले नाहीत

या नव्या नियुक्त्यांमुळे अकोला जिल्ह्यातील काँग्रेसला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या निर्णायक ठरू शकतात. प्रदेश कार्यकारिणीत अकोल्याचे प्रतिनिधित्व वाढल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.