Breaking

Irregular tender process at District Women’s Hospital : अकोल्यातील तीन वरिष्ठ आरोग्य अधिकारी निलंबित

Three senior health officials from Akola suspended : आमदारांच्या प्रश्नावरून मोठी कारवाई; नियमबाह्य निविदा प्रक्रिया भोवली

Akola अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत एसएनसीयू विभागासाठी मनुष्यबळ पुरवठ्याच्या निविदा प्रक्रियेत गंभीर आर्थिक अनियमितता आणि नियमभंग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करत तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. ही कारवाई वाशिमचे आमदार श्याम खोडे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नावरून झाली. त्यानंतर सरकारने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली.

निलंबित अधिकारी:
डॉ. तरंगतुषार वारे – जिल्हा शल्यचिकित्सक
डॉ. जयंत पाटील – वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय
ए. एन. डामरे – प्रशासकीय अधिकारी

Sanatani terrorism : सनातनी दहशतवाद? हे तर ‘ थिंक टँक नव्हे, सेप्टिक टँक!’

– निविदा प्रक्रिया ई-निविदा पोर्टलऐवजी फक्त जेईएम पोर्टलवर राबविण्यात आली.
– ७२ निविदाधारकांपैकी केवळ ४ जणांना तांत्रिक पात्र ठरवले गेले.
– केवळ २ निविदा अंतिम पात्र ठरवण्यात आल्या, जे शासन नियमांचा भंग आहे.
– ही संपूर्ण प्रक्रिया 1 डिसेंबर 2016 च्या शासन निर्णयाच्या विरोधात राबवण्यात आली.
– शासननुसार, दरपत्रक उघडण्यापूर्वी किमान ३ निविदा तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे.

Teachers constituency : अमरावती विभागासाठी शिवसेनेची रणनिती; भगवा फडकवण्याचा निर्धार

या प्रकरणामुळे जिल्हा पातळीवरील आरोग्य व्यवस्थापनातील दुर्लक्ष, नियमभंग आणि ‘मर्जीतील कंत्राटदारांना’ लाभ देण्याच्या प्रथांवर प्रकाश पडतो. आमदार श्याम खोडे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून जनहिताचा मुद्दा मांडल्यामुळे ही मोठी प्रशासकीय कारवाई शक्य झाली.