Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, मला काँग्रेस नेत्यांची कीव येते

Congress leaders are misleading the people of the country : वरुडमध्ये काँग्रेसवर जोरदार टीका, विक्रम ठाकरेंचा भाजपमध्ये प्रवेश

Amravati मला काँग्रेसच्या नेत्यांची कीव येते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तेव्हा कुणीही मतदार यादीवर आक्षेप घेतला नाही. प्रत्यक्ष मतदानावेळीही कुणी हरकती नोंदवल्या नाहीत. जेव्हा लोकसभेत त्यांचे जास्त खासदार निवडून आले, तेव्हा ते शांत होते. आता सात महिन्यांनंतर राहुल गांधी सांगत आहेत की मतदार यादी चुकीची आहे. हा लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी वरुड येथे झालेल्या कार्यक्रमात बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत महायुतीच्या विजयाचे गणित स्पष्ट केले.

Pawar Vs Padalkar : ‘रोहित पवार औरंगजेबाच्या वृत्तीचा’, पडळकरांचा पलटवार

बावनकुळे म्हणाले, “विधानसभेच्या निवडणुका होऊन सात महिने झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने नागरिकांसाठी विजेचे बिल पुढील पाच वर्षांसाठी माफ केले. तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेसह ४० ते ४५ योजना सुरू केल्या. यामुळे लोकसभेपेक्षा विधानसभेत महायुतीला अधिक मते मिळाली आणि आम्ही तब्बल ६९ लाख मतांनी पुढे राहिलो.”

Ministers U turn : क्रीडा खातं बरं होतं; आता त्रास घ्यावाच लागेल

या पक्षप्रवेश कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार रामदास तडस, आमदार उमेश यावलकर, आमदार राजेश वानखडे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.