Jitendra Awhad : भाजपाचा ओबीसी आरक्षणाला विरोध, आव्हाड यांचा आरोप

Former minister alleges that BJP is opposing OBC reservation : शहरातील जानोरकर सभागृहात मंडल यात्रा मेळावा

Akola भाजप आपल्या प्रचारात ‘आमचा डीएनए ओबीसी’ असल्याचा दावा करतो. मात्र, ज्यावेळी देशात तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी ओबीसी समाजाच्या विकासासाठी मंडल आयोग लागू केला, तेव्हा या आरक्षणाच्या विरोधात भाजपने ‘कमंडल यात्रा’ काढली होती. त्यामुळे भाजपचे ओबीसी प्रेम हे बनावट असून, या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे राज्यात ‘मंडल यात्रा’ आयोजित करण्यात आली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

स्थानिक रिंगरोड परिसरातील जानोरकर मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) च्या वतीने आयोजित मंडल यात्रा मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या आयोजनातील या कार्यक्रमात आव्हाड यांनी मार्गदर्शन केले.

Vidarbha Farmers : अवैध सावकारीवर धाड; कागदपत्रे जप्त, कारवाईने हादरले

यावेळी पक्षाचे ओबीसी राज्य प्रमुख राज राजापूरकर, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, डॉ. आशा मिरगे, प्रा. विश्वनाथ कांबळे, सय्यद युसुफ अली, देवानंद टाले, सदस्य विशाल गावंडे, नंदा पाऊलझगडे, सरला वरघट, आसिफ खलीफे, विष्णुदास धुईदाट आदी उपस्थित होते.

तसेच इब्राहिम घानीवाला, कैलास गोंडचवर, शंकरराव चौधरी, अजय पागृत, शिवाजी म्हैसणे, राजेश भाकरे, अशोक नराजे, श्रेयस चौधरी, मंगेश कुकडे, सतीश गावंडे, एजाज खान, राम कोरडे, निजामभाई इंजी, गजानन भटकर, अल्पसंख्यांक अध्यक्ष प्रा. बिस्मिल्ला खान, शेषराव तायडे, महेश लबडे, राजेंद्र मोहोड, राजेंद्र इंगोले, शिवाजी पटोकार, परिमल लहाने, गोपाल कटाळे, दिवाकर गावंडे, सागर कोरडे, रामेश्वर वाघमारे, श्रीधर मोरे, राजेश राऊत, करण दोड, पंकज गावंडे, रवी महल्ले, पापाचंद्र पवार, बाबा घुमरे, योगेश सोनोने, शैलेश बोदडे, अविनाश ठाकरे, प्रा. डॉ. गजानन वाकोडे, ज्ञानेश्वर सावरकर, ज्ञानेश्वर माळी, श्रीकांत साबळे, विवेक बोचे, वैभव नागलवाड, प्रकाश सोनोने, सुगत तायडे, प्रमोद बनसोड, संदेश धनबहादूर, कोकीळा वाहूरवाघ, मनीषा महल्ले, मेघा पाचपोर, संगीता दाळू आदी उपस्थित होते.

Constitution Amendment : 30 दिवस तुरुंगात… आणि पद गेले !

या वेळी ओबीसी नेते राज राजापूरकर यांनी राज्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मंडल यात्रेची माहिती दिली. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंडल यात्रेचा संदेश घराघरात पोहोचवून राज्यात समतेची ज्योत प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.