Pawars warning : पक्षाच्या नावावर दुकानदारी केली तर त्याचा बंदोबस्त करणार,

Ajit Pawars direct warning to workers : अजित पवारांचा कार्यकर्त्यांना थेट इशारा

Nagpur : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट इशारा दिला आहे की, आमच्या आणि पक्षाच्या नावावर कोणी दुकानदारी करणार असेल, तर त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी माझी आहे. कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये आपली प्रतिमा चांगली ठेवली पाहिजे, अन्यथा कारवाई होईल, असे पवार म्हणाले.

नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना विजयगड बंगला मिळालेला आहे. या बंगल्यात लोक आणि कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी त्यांनी स्वतंत्र स्टाफ नेमला आहे. मात्र या स्टाफने सांगितले की, जिल्हाध्यक्ष आणि काही पदाधिकारी कार्यालयात येतच नाहीत. जे थोडेफार येतात, त्यांच्या तक्रारी ऐकून सोडवण्याचा प्रयत्न केला जातो, असं पवारांनी सांगितलं.

“लोक घरी बसून म्हणतात माझं काम करा, असं होणार नाही. माझ्या कार्यालयात कोण कोण आलं, त्याची नोंद होते आणि पुरावे उपलब्ध आहेत. कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून काम करावं. काम केलं म्हणून लोक आपल्याला मतं देतात, हे डोक्यातून काढून टाका. लोक कोणत्या कामाला महत्त्व देतात, ते ते पाहून मत देतात,” असं अजित पवार म्हणाले.

Entry into BJP : खासदार प्रतिभा धानोरकरांच्या दीराचा भाजपात प्रवेश

ते म्हणाले, “तुम्ही मला कामाची यादी द्या, मी ती अधिकाऱ्यांकडे देतो. मग जेव्हा कार्यकर्ते त्या कामासाठी जातील, तेव्हा अधिकारी समजतात की अजित पवाराने सांगितलंय. मात्र नियमबाह्य किंवा वैयक्तिक कामं चालणार नाहीत. ती सार्वजनिक हिताची असली पाहिजेत. जे अधिकारी काम करत नाहीत, त्यांची मी कान उघाडणी करीन.”

महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा दाखला देत पवार म्हणाले, “विरोधक विरोधात असूनही ३१ जागा जिंकतात, आणि आपण सत्तेत असूनही फक्त १७ जागा जिंकतो. म्हणून कार्यकर्त्यांनी जनतेत विश्वासार्ह प्रतिमा तयार करणे गरजेचे आहे. पक्षात महिला वर्गाचा सन्मान राखा, लोकांसाठी धावून जा, तेव्हाच पक्ष मजबूत होतो.”

Lok Sabha Session : लोकसभा अधिवेशन : ८४ तास वाया

त्यांनी आणखी स्पष्ट केलं की, “काही पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिली तरी ते ५० मतं घेऊ शकत नाहीत. उमेदवारी मागताना जनमानसात चांगली प्रतिमा असली पाहिजे. ऑक्टोबरपर्यंत मी विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेणार आहे.”अखेर अजित पवार यांनी “पक्षाच्या नावावर कोणी दुकानदारी करणार असेल, तर त्याचा बंदोबस्त करेन.” असा कठोर संदेश कार्यकर्त्यांना दिला.