Mutton dispute : ‘हा’ पांडुरंगाचा आणि माळकऱ्यांचा अपमान !

Warkari sect angered over Supriya Sule’s statement : सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर वारकरी संप्रदायाचा संताप

Mumbai : मांसाहाराच्या मुद्यावरून राज्याच्या राजकारणात तापलेलं वातावरण आता वारकरी संप्रदायापर्यंत पोहोचलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी “मग तुम्हाला काय अडचण आहे?” असा सवाल उपस्थित करत भाजप – महायुतीतील नेत्यांवर हल्लाबोल केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर वारकरी संप्रदायातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, ह. भ. प. बाळासाहेब महाराज खरात यांनी थेट सुळे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

खरात म्हणाले, मी समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि माळकऱ्यांच्या वतीने सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. पांडुरंगाला मांसाहार चालतो असं कुठलाही शहाणा माणूस कधीच म्हणणार नाही. हा पांडुरंगाचा आणि माळकऱ्यांचा अपमान आहे. आम्हाला त्यांच्याकडून फारशी अपेक्षा नाही. कारण त्यांच्या वडिलांनीच कधी पांडुरंगाच्या चरणावर डोकं टेकवलं, असं तरी कुणी पाहिलंय का? मग लेकीकडून काय अपेक्षा ठेवायची? असा संतप्त सवाल त्यांनी केला.

Maratha movement : मनोज जरांगेच्या बैठकीला पैशांचा पुरवठा कोण करतो?

 

याचबरोबर त्यांनी कठोर शब्दात इशाराही दिला. सत्तेसाठी ही मंडळी कुठल्याही थराला जातील. वाचाळवीरांसारखं काय बोलतील, सांगता येत नाही. पण आम्ही पांडुरंगाचा अपमान कधीही सहन करणार नाही. जर सुप्रिया सुळे यांनी अशा प्रकारचं वक्तव्य पुन्हा केलं तर संपूर्ण वारकरी संप्रदाय त्यांना धडा शिकवेल. मी स्वतः देखील गप्प बसणार नाही. कारण मी माझ्या पांडुरंगाचा, माझ्या संप्रदायाचा अपमान सहन करणार नाही. मी ज्याचं खातो त्याचाच गातो, पुढाऱ्यांचं गाणं कधी गाणार नाही, असे खरात यांनी स्पष्ट केले.

Urban development : नगरविकास खात्याला मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी “वारकरीच सुप्रिया सुळे यांना उत्तर देतील” असे वक्तव्य केले होते. आता खरात महाराजांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.