GST Reforms : काँग्रेस तंबाखू, गुटख्यावर 5 टक्के कराची मागणी करत आहे का?

Finance Minister Nirmala Sitharamans counterattack : वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचा पलटवार

New Delhi : जीएसटी सुधारांवर काँग्रेसकडून टीका होत असताना केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, “काँग्रेस आपल्या काळात जीएसटी लागू करणे अशक्य मानत होती. मात्र, मोदी सरकारने केवळ जीएसटी लागूच केला नाही तर आता दुसऱ्या टप्प्यातील सुधारांमुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलली आहेत.”

सीतारामन म्हणाल्या, “काँग्रेस पक्ष खरंच तंबाखू आणि गुटख्यावर केवळ 5 टक्के कर लागू करण्याची मागणी करत आहे का? जर तसे असेल तर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या पिढीतील सुधार राबवत आहोत, ज्यामुळे लोकांना त्यांच्या रोजच्या गरजांमध्ये दिलासा मिळेल.”

New GST rate : केंद्र सरकारचा दिवाळी धमाका! टीव्ही, कपडे, खाद्यपदार्थ स्वस्त !

वित्तमंत्र्यांनी पुढे सांगितले की, जीएसटीतील सुधारांमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच मजूर – प्रधान उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. अनुपालन प्रक्रिया सुलभ झाल्याने रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि उद्योगांना अधिक पारदर्शक वातावरण मिळेल. काँग्रेसने हे ठरवायला हवे की ती लोकहिताच्या मुद्द्यांना पाठिंबा देणार आहे की त्याला विरोध करणार आहे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, 56 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. 12 टक्के आणि 28 टक्के जीएसटी दर रद्द करण्यात आले असून आता फक्त दोनच 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच स्लॅब राहणार आहेत. यामुळे अनेक आवश्यक वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत.

Blast at solar company : नागपूरच्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट

सीतारामन यांनी सांगितले की, रोजच्या वापरातील वस्तूंवर मोठा दिलासा देण्यात आला आहे. केसांचे तेल, शाम्पू, टूथपेस्ट, साबण, टूथब्रश, शेविंग क्रीम यांसारख्या वस्तूंवर आधी 18 टक्के जीएसटी होता, जो आता फक्त 5 टक्के करण्यात आला आहे. तसेच आरोग्य विमा आणि जीवन विम्यावरचा जीएसटी पूर्णपणे हटवण्यात आला आहे.

कृषी क्षेत्रालाही मोठा लाभ होणार आहे. ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे टायर्स आणि सुटे भाग, ज्यावर पूर्वी 12 आणि 18 टक्के जीएसटी होता, त्यावर आता फक्त 5 टक्के कर लावला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.

Congress aggression : भाजपने मत चोरी करून 132 आमदार निवडून आणले !

मोदी सरकारने केलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी आणि उद्योग क्षेत्राला थेट फायदा मिळणार असून काँग्रेसने अशा लोकहिताच्या उपाययोजनांना विरोध का करावा? असा सवाल वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी उपस्थित केला.

____