व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश Shocking theft : १ कोटींचा रत्नजडित कलश चोरट्यांनी लांबवला !

Shocking theft : १ कोटींचा रत्नजडित कलश चोरट्यांनी लांबवला !

Big scandal in the Red Fort, Question mark on security : लाल किल्ल्यात मोठ कांड! सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?

Delhi : देशाच्या राजधानीत लाल किल्ला परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. जैन समाजाच्या धार्मिक अनुष्ठानादरम्यान तब्बल एक कोटी रुपयांचा सोन्या-रत्नांनी मढवलेला कलश चोरट्यांनी चोरून नेला. राजधानीतील कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये घडलेली ही चोरी पोलिसांसाठी मोठा धक्का ठरली असून सुरक्षेच्या त्रुटींवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लाल किल्ल्यालगत 15 ऑगस्ट पार्क येथे जैन समाजाचा धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम ९ सप्टेंबरपर्यंत चालणार असून रोज व्यापारी सुधीर जैन यांच्या हस्ते सोन्या-रत्नांनी सजवलेला कलश पूजा करून आणला जात होता. कार्यक्रमात अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती असल्याने आयोजक आणि समुदायातील लोक त्यांच्याच स्वागत आणि धार्मिक विधीमध्ये व्यग्र होते. त्याचवेळी चोरट्यांनी संधी साधून 760 ग्रॅम सोने, 150 ग्रॅम हिरे, तसेच माणिक, मोती, पन्ना यांनी सजवलेला हा मौल्यवान कलश चोरून नेला.

Contract workers strike : कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप १९ व्या दिवशीही सुरूच !

कार्यक्रमातील गजबज आणि पूजेच्या गडबडीत बराच वेळ हा कलश चोरीला गेल्याचे कुणालाही समजले नाही. मात्र काही वेळाने कलश नजरेस न पडल्याने खळबळ उडाली. लगेचच आयोजकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.  लाल किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. त्यातील फुटेज तपासल्यावर काही संशयास्पद हालचाली पोलिसांच्या नजरेत आल्या आहेत. पोलिसांनी या व्यक्तींची प्राथमिक ओळख पटवल्याचे समोर आले आहे. लवकरच आरोपी अटकेत येतील आणि कलशही परत मिळेल, असे आश्वासन पोलिसांनी आयोजकांना दिले आहे.

Rohit Pawar : रोहित पवारांचा प्रश्न ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ कुठे आहेत?

या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत कलम 303(2) नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांचे अनेक पथक या तपासावर काम करत असून कलश परत मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत.
जैन समुदायाच्या या मोठ्या धार्मिक सोहळ्यात चोरट्यांनी घडवून आणलेली ही घटना समुदायात संतापाची लाट निर्माण करणारी ठरली आहे. लाल किल्ल्यासारख्या ऐतिहासिक आणि संवेदनशील परिसरात असा मोठा चोरीचा प्रकार घडणे ही सुरक्षाव्यवस्थेची गंभीर पोकळी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यातील सर्वात मोठी अपडेट !

 

कार्यक्रम अद्याप सुरू असून ९ सप्टेंबरला तो संपणार आहे. पण त्याआधीच घडलेल्या या चोरीच्या प्रकरणाने धार्मिक कार्यक्रमात नाराजी आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. आता पोलिसांची पुढील कारवाई आणि कलश परत मिळवणे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

____

error: Content is protected !!