व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home देश-विदेश Modi on Trump : राष्ट्राध्यक्षांच्या भावनांबद्दल ‘तहे दिल से सराहना करते हैं’

Modi on Trump : राष्ट्राध्यक्षांच्या भावनांबद्दल ‘तहे दिल से सराहना करते हैं’

Prime Minister Modis response to Trumps statement : ट्रम्पच्या वक्तव्याला पंतप्रधान मोदींचं उत्तर

New Delhi : टॅरिफ आणि रशियाकडून तेल खरेदी या मुद्द्यांवरून भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणावाचं वातावरण आहे. अशा पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. “भारत आणि अमेरिकेचं नातं खास आहे. मी नेहमीच मोदींचा मित्र राहीन, ते महान पंतप्रधान आहेत”, असं ट्रम्प यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रतिसाद दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लिहिलं “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावना आणि आमच्या संबंधांबद्दलच्या सकारात्मक मूल्यांकनाची आम्ही ‘ तहे दिल से सराहना करते है’. आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देतो. भारत आणि अमेरिकेमध्ये अत्यंत सकारात्मक, दूरदर्शी, व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे.”

Threat to officer : आधी आयपीएस अंजना कृष्णांच्या चौकशीची मागणी !

शुक्रवारी व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले “मी नेहमी मोदींचा मित्र राहीन, ते महान पंतप्रधान आहेत. पण सध्या ते जे काही करत आहेत, ते मला पसंत नाही. मात्र भारत आणि अमेरिकेचं नातं खास आहे. आमच्यात असे चढउतार येत असतात, पण चिंता करण्यासारखं काही नाही.”

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना विचारण्यात आलं होतं की, ते भारताशी संबंध पुन्हा सुधारण्यासाठी तयार आहेत का? यावर त्यांनी हे उत्तर दिलं. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी समाज माध्यमावर एक जुना फोटो शेअर केला होता. त्यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी एकत्र दिसत होते. हा फोटो पोस्ट करताना ट्रम्प म्हणाले “असं वाटतंय की आपण भारत आणि रशियाला चीनच्या हातात गमावलं आहे. देव करो त्यांचा भविष्यातील प्रवास समृद्ध होवो!”

Congress : जीएसटी कपात ही निवडणुकीपूर्वीची दिखाऊ योजना

यानंतर ट्रम्प यांनी भारताच्या रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदीवर नाराजी व्यक्त केली होती. “भारतावर आम्ही 50 टक्के टॅरिफ लावलं आहे. मला निराशा वाटली की भारत इतकं तेल रशियाकडून घेईल. पण मोदी माझे चांगले मित्र आहेत, काही महिन्यांपूर्वी ते इथे आले होते,” असं ट्रम्प म्हणाले.

Mehkar Panchayat Samiti : सुनावणीसाठी एकाच दिवशी ९० अधिकारी–कर्मचारी अमरावतीत

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यामुळे आणि रशियाकडून तेल खरेदीसाठी दंडात्मक शुल्क बसवल्यामुळे संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याचदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी चीनमधील तियानजिन येथे झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेला हजेरी लावली. तिथे त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत मैत्रीपूर्ण चर्चा केली. त्यानंतर अमेरिकेतच ट्रम्प प्रशासनावर टीका झाली आणि संबंध अधिक ताणले गेले.ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्यानंतर मात्र दोन्ही देशांच्या संबंधांवर पुन्हा सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!