Selling cylinders by extracting gas : ग्राहकांची फसवणूक; पोलिसांनी उघडकीस आणला प्रकार
Gondia गॅस सिलिंडरच्या किंमती कधी वाढतात कधी कमी होतात. पण सर्वसामान्य नागरिकांच्या घरी जाणाऱ्या जाणाऱ्या सिलिंडरमधील गॅसही कमी-जास्त होत असतो. पण पेट्रोलियम कंपन्यांकडून येणाऱ्या सिलिंडरमध्ये हा प्रकार होत नाही. तर गॅसचा काळा बाजार करणाऱ्यांकडून होतो. कंपनीकडून आलेल्या सिलिंडरमधून गॅस काढला जातो. आणि त्यानंतर सिलिंडर विकला जातो, हा प्रकार उघडकीस आला आहे.
ग्राहकांना वितरित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भरलेल्या सिलिंडरला इलेक्ट्रिक मोटार लावून रेग्युलेटरच्या सहाय्याने काही प्रमाणात गॅस काढला जातो. त्यानंतर रिकाम्या सिलिंडरमध्ये भरला जातो. हा प्रकार चोरीचा तर आहेच, शिवाय यात खूप मोठा धोका देखील आहे. कारण कुठल्याही क्षणी आगीचा थोडा जरी संपर्क आला तर खूप मोठा अनर्थ घडू शकतो. हा काळाबाजार करताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये टाकत असताना पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम गोंडीटोला येथील इंडेन गॅस कंपनीच्या गोदामात ही कारवाई करण्यात आली. गॅस सिलिंडरमधून गॅस काढून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. तसे प्रकार उघडकीससुद्धा आले आहेत. यातूनच रामनगर पोलिसांनी ग्राम गोंडीटोला येथील इंडेन गॅस कंपनीच्या गोदामावर धाड घातली.
सुरेश परतेती व सुरेश दमाहे अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही ग्राहकांसाठी असलेल्या सिलिंडरला इलेक्ट्रिक मोटार लावून रेग्युलेटरच्या सहाय्याने काही प्रमाणात गॅस काढून घेत होते. तो गॅस रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून काळाबाजार करत होते. असे करताना त्यांना पकडण्यात आले. तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक हेमराज वसंत शहारे (३९) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.
Prataprao Jadhav on Hair loss disease : केस गळतीचे निदान नाहीच; आता ICMR चे शास्त्रज्ञ येणार
वजन करा, गॅस कमीच असेल!
आपल्याकडे येणाऱ्या घरगुती सिलिंडरचे वजन केले तर त्यात गॅस कमीच असेल, असा दावा या प्रकरणानंतर करण्यात येत आहे. जवळपास अडीच किलो गॅस कमी असण्याची शक्यता असते, असे हा प्रकार उघडकीस आणणाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सिलिंडर घेताना त्याचे वजन करून घेण्याचा सल्ला दिला जात आहे.