The defeated BJP candidate demanded to keep the election record secure : भाजपच्या पराभूत उमेदवाराचा उच्च न्यायालयात अर्ज
Akola अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले भाजप उमेदवार विजय अग्रवाल Vijay Agrawal यांनी निवडणुकीतील अनियमिततेचा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात High Court निवडणूक याचिका दाखल केली आहे. या याचिकेअंतर्गत त्यांनी अकोला पश्चिम तसेच बाळापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे रेकॉर्ड सुरक्षित ठेवण्याची मागणी करणारा स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे.
अग्रवाल यांनी अकोला पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार साजीद खान पठाण विजयी झाले. मात्र, हा विजय अवैध मतदानाच्या आधारे मिळाल्याचा आरोप अग्रवाल यांनी न्यायालयात केला आहे. काही मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्यामुळे निकालावर परिणाम झाला, असा दावा त्यांनी याचिकेत नमूद केला आहे. त्यामुळे पठाण यांची निवड रद्द करून निकाल रद्दबातल ठरविण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे.
Local Body Elections : महापालिका प्रभाग रचनेच्या प्रारूपावर १३३ आक्षेप
त्यांनी दाखल केलेल्या अर्जात विशेषतः पोलिंग स्टेशन-२०३ मधील मतदान प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. त्या केंद्रावर मतदार याद्यांतील नावे व प्रत्यक्ष मतदान यामध्ये विसंगती असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला आहे. त्यासोबतच पोलिंग रजिस्टर्स, मतदानाची नोंद घेतलेल्या मतदार याद्या, त्या दिवशी उपलब्ध असलेले सीसीटीव्ही फुटेज तसेच व्हीव्हीपॅटमधील पेपर स्लीप्स यासह संबंधित रेकॉर्ड न्यायालयीन निर्णय होईपर्यंत सुरक्षित ठेवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली आहे.
अग्रवाल यांच्या वकिलांनी न्यायालयीन सुनावणीत सांगितले की, जर हे रेकॉर्ड योग्य प्रकारे सुरक्षित ठेवले गेले नाहीत, तर निवडणूक याचिकेवर योग्य तपासणी होणे कठीण होईल. निवडणुकीची पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी ही नोंदी संरक्षित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या अर्जावर न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोग तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी यांना नोटीस बजावली आहे. अर्जातील मुद्द्यांवर येत्या १९ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
Vidarbha Farmers : नुकसानभरपाई मिळाली नाही, विमा कंपनीत ठिय्या
यामुळे अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या निकालावर न्यायालयीन निर्णयाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. विजय अग्रवाल यांच्या या याचिकेमुळे केवळ अकोला पश्चिमच नव्हे, तर बाळापूर मतदारसंघातील रेकॉर्डची देखील तपासणी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळासह मतदारांचे लक्ष लागले आहे.