Zilla Parishad Election : प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी १ हजार मतदार!

Average 1,000 voters at each polling booth : निवडणुकीचे पडघम; मतदार यादी कार्यक्रम जाहीर, अंतिम प्रभाग रचनेनुसार विभाजन

Akola जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी प्रसिद्ध केला. येणाऱ्या निवडणुकांसाठी विधानसभा निवडणुकीत वापरलेली मतदार यादीच वापरण्यात येणार असून, अंतिम प्रभाग रचनेनुसार मतदार यादीचे विभाजन केले जाईल. तसेच २७ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने २२ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना जारी केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका विहित वेळेत पार पाडण्याचे निर्देश दिल्यानंतर निवडणूक विभागाने तयारीला गती दिली आहे. त्यानुसार, १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीच्या आधारे विभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा

District Co-operative Bank : विरोधकांकडून जिल्हा बँकेची नैराश्यातून बदनामी

८ ऑक्टोबर : विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध.
८ ते १४ ऑक्टोबर : प्रारूप यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी.
८ ते १८ ऑक्टोबर : दाखल झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी व विचार.
२७ ऑक्टोबर : विभाग व निर्वाचक गणनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध.
२७ ऑक्टोबर : मतदान केंद्रनिहाय यादी प्रकाशित.

हरकती व सूचनांवर विचार करून लेखनिक चुका, चुकीच्या गटातील मतदारांचा समावेश, तसेच विधानसभा यादीत नावे असूनही जिल्हा परिषद यादीत नावे राहून गेले असल्यास ती समाविष्ट करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यानंतर आवश्यक सुधारणा करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

Road repair : राज्यातील रस्त्यांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी ₹१२९६ कोटीं

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, प्रत्येक मतदान केंद्रावर साधारणतः १,००० ते १,१०० मतदार असतील. तथापि, विभाग व गणातील उर्वरित मतदारांची संख्या किमान-अधिक प्रमाणापेक्षा १० टक्क्यांच्या फरकात असल्यास स्वतंत्र मतदान केंद्राची आवश्यकता भासणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.