व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Asia Cup 2025 : १५ दिवसांपूर्वी नक्वीसोबत फोटो काढला, आता मूर्ख बनवताय?

Asia Cup 2025 : १५ दिवसांपूर्वी नक्वीसोबत फोटो काढला, आता मूर्ख बनवताय?

Sanjay Rauts attack on Team India : संजय राऊतांचा टीम इंडियावर हल्लाबोल

Mumbai : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर पाच गडी राखून शानदार विजय मिळवला. या स्पर्धेत तिसऱ्यांदा पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर भारताच्या विजयानंतर ट्रॉफी वितरणावेळी मोठा वाद उद्भवला. पाकिस्तानचे मंत्री आणि आशियाई क्रिकेट कौन्सिलचा अध्यक्ष मोहसीन नक्वीकडून विजयाची ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने स्पष्ट नकार दिला. या घडामोडीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीम इंडियावर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, “ही संपूर्ण नौटंकी आहे. तुम्ही मैदानावर पाकिस्तानसोबत खेळत आहात, ज्याला देशातील बहुसंख्य लोकांचा विरोध आहे. राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेलाही नाही. अनेक ठिकाणी सामना दाखवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा लोकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. भारतीय खेळाडूंनी मोहसीन नक्वीच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, पण खेळलात ना? पंधरा दिवसांपूर्वी त्याच मोहसीन नक्वीसोबत याच भारतीय संघाने फोटो काढले, हस्तांदोलन केले. मग देशाला काय मूर्ख बनवताय का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Farmer’s Losses : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेगाव संस्थानही सरसावले !

राऊत म्हणाले की, “मैदानावर स्वरूप वेगळं आणि आतलं स्वरूप वेगळं आहे. तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? तुम्ही पंतप्रधानांपासून देशाला मूर्ख बनवायची प्रेरणा घेतली आहे का? हे लोकांसमोर यायलाच हवे. तुम्ही सामना खेळलाच का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.”

Special Session : विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी !

याचबरोबर त्यांनी बीसीसीआय आणि जय शाह यांच्यावरही टीका केली. “जय शाह आल्यापासून भारतीय क्रिकेट बोर्डात महाराष्ट्रातील खेळाडू दिसत नाहीत. हे ठरवून सुरू आहे का? हा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाने स्वतःला विचारला पाहिजे. अनेक भारतीय क्रिकेटच्या संस्थांमधून महाराष्ट्राला दूर करण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. त्यामुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आनंदावर संजय राऊतांच्या या विधानामुळे नवा वादंग उभा राहिला आहे.

error: Content is protected !!