Shiv Sena counterattacks BJP’s advice by asking tough questions : खोचक सवाल करत, भाजपच्या सल्ल्यावर शिवसेनेचा पलटवार
Mumbai : मुंबईत शिवसेना ठाकरे गट यंदाही परंपरेप्रमाणे दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच घेणार आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिल्याने काही शंका निर्माण झाल्या होत्या, मात्र रविवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाम निर्णय घेण्यात आला कितीही पाऊस झाला तरी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार. मैदानावर व्यासपीठ उभारणी, आसनव्यवस्था आणि तयारीला वेग आला आहे.
शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपने टीका केली आहे. प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला की, दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा. त्यांनी उपरोधाने म्हटलं, “मुख्यमंत्री असताना कधी कृती केली नाही, आता प्रायश्चित्त घ्या. मेळाव्याच्या थाटामाटापेक्षा मदत महत्त्वाची आहे.”
Change criteria : मदतीचे निकष बदलण्याची मागणी, प्रशासनावर आरोप !
मात्र, या सल्ल्यावर ठाकरे गटाने पलटवार केला आहे. प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी विचारलं “दसरा मेळाव्याचा खर्च पूरग्रस्तांना द्यावा असं म्हणणारे उपाध्ये, संघाच्या नागपूरमधील मेळाव्यावर का गप्प आहेत? लाखो रुपयांचा खर्च होतो, तो का रद्द करू नये?” असं प्रतिप्रश्न करून शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडलं.
Mumbai Attack : म्हणून मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई केली नाही !
शिवसेना दसरा मेळाव्याची परंपरा तब्बल 58 वर्षांची आहे. 2006 साली मुसळधार पावसामुळे, 2009 मध्ये आचारसंहितेमुळे आणि 2020-21 मध्ये करोना संकटामुळेच मेळावा रद्द किंवा बंदिस्त सभागृहात घेण्यात आला होता. 2022 पासून शिंदे गट आणि ठाकरे गट स्वतंत्र मेळावे घेत आहेत. यंदाही शिवसेना ठाकरे गट मैदानातच ताकद दाखवणार आहे.
______








