98 office-bearers of Uddhav Thackeray join Eknath Shinde’s Shivsena : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपूर्वी मोठा धक्का
Mehkar कळंबेश्वर व देऊळगाव माळी जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समितीच्या चार गण विभागातील शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी–कार्यकर्ता मेळावा आज दुधा ब्रह्मपुरी येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी उबाठा येथील तब्बल ९८ पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी या पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला. ‘केंद्र व राज्यात आपली सत्ता आहे. त्यामुळे परिसराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेला मतदान करून सत्ता आणणे गरजेचे आहे,’ असं यावेळी जाधव म्हणाले.
Sanjay Gaikwad : शिंदेंचे आमदार म्हणतात, ‘उपऱ्या भाजपसोबत युती नाही’!
यावेळी आमदार संजय रायमुलकर, कार्यक्रमाचे आयोजक किसनराव पाटील, सुदर्शन मगर, विलास मोहरूत व विठ्ठल भाकडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. मेळाव्याला जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, राजेंद्र गाडेकर, दिलीप देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, डॉ. केशव अवचार, महिला आघाडीच्या मायाताई मस्के यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांत महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी करणे आवश्यक आहे. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच सज्ज व्हावे.”
Scam in fair price shop : खामगावमध्ये मोठा घोटाळा! १९१ क्विंटल रेशनचे धान्य केले फस्त!
या कार्यक्रमात गजानन मोरे, भागवत देवकर, विलास भाकडे, दत्ता निकम, नितीन बोऱ्हाडे, शिवाजी बोऱ्हाडे, हरी ढोले, गजानन चांगडे, रमेश वाघमारे, विनोद अंभोरे, किसन बनसोडे, गोपाल चांगाडे, विठ्ठल शिनगारे, प्रल्हाद अंभोरे, प्रताप लंबे, विष्णु पदमने, रामदास गायकवाड यांच्यासह उबाठा पक्षाच्या ९८ कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.








