Farmers in Crisis : शेतकऱ्यांना राज्य बॅंकेकडून १० कोटींची मदत !

State Bank Extends ₹10 Crore Aid to Farmers Affected by Heavy Rains : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही केला कर्जपुरवठा

Mumbai : सहकार क्षेत्राच्या पतरेचनेतील शिखर बॅंक असलेली राज्य सहकारी बॅंक जिल्हा बॅंकांच्या मदतीने शेतकऱ्यांना नेहमीच अर्थसहाय्य करत असते. या बॅंकेने शेतकऱ्यांना आतापर्यंत या वर्षीच्या मार्च अखेरील आर्थिक वर्षात एकुण कर्जाचे ४७ टक्के कर्जवाटप केले आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्यासाठीही राज्य बॅंक पुढे आली आहे. भरघोस १० कोटी रुपयांची मदत राज्य बॅंकेने शेतकऱ्यांना केली आहे.

आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला राज्य सहकारी बॅंकेने नफ्यातून १० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले. नुकत्याच झालेल्या ११४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बॅंकेच्या प्रशासनाने ही घोषणा केली होती. त्यानंतर या रकमेचा धनादेश नुकताच मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. राज्य सरकारी बॅंकेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही एकुण कर्जाच्या २६ टक्के कर्जपुरवठा केलेला आहे.

America in chaos : टॅरिफचा दबाव आणणाऱ्या अमेरिकेत मोठा हाहा:कार !

राज्य बॅंकेच्या बोधचिन्हाच्या मध्यभागी शेतकऱ्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांच्या हिताची संकल्पना घेऊन बॅंकेने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. कंपनी कायद्याखाली स्थापन झालेल्या बॅंकांना व इतर कंपन्यांना सीएसआर निधी असतो, तसा निधी बॅंकांकडे उपलब्ध नसतो. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांनुसार त्यांना त्यांच्या गतवर्षीच्या निव्वळ नफ्याच्या केवळ १ टक्का निधी सामाजिक कार्यासाठी वापरता येतो. परंतु मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ही मर्यादा गतवर्षीच्या नफ्याच्या दोन टक्के आहे.

Vijay Wadettiwar : १५ कोटींचा सुट घालणाऱ्याला त्याग कसा कळणार ?

राज्य सहकारी बॅंकेला गेल्या वर्षी ६५१ कोटींचा नफा झाला आणि रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांनुसार राज्य बॅंकेने जास्तीत जास्त म्हणजे १० कोटींची निधी दिला आहे. अशा प्रसंगांसाठी रिझर्व्ह बॅंकेने हा निधी वाढवण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून राज्यातील सर्व सहकारी संस्थांनी आपल्या नफ्यातील जास्तीत जास्त निधी शेतकऱ्यांसाठी देण्याचे आवाहन राज्य सहकारी बॅंकेने केले आहे.