Akola Municipal Corporation election : अकोला पूर्वमध्ये काय चुकले? एकही नगरसेवक नसल्याची काँग्रेसला खंत

Congress regrets having no corporator in Akola East : आढावा बैठकीत झाले चिंतन, एकजुटीसोबतच आघाडीच्या पर्यायावर चर्चा

Akola अकोला महानगरपालिकेच्या पूर्व मतदारसंघ क्षेत्रात काँग्रेसचा एकही नगरसेवक नसल्याची खंत काँग्रेस पक्षनिरीक्षक व माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी व्यक्त केली. येथील पक्षाच्या आढावा बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने व उमेदीने निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले.

महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रभाग क्रमांक ३, ४, ५, ६, १०, १४, १७ आणि २० मधील माजी उमेदवारांनी आपली मते मांडली. पक्षाची सद्यस्थिती, येणाऱ्या निवडणुकीतील धोरण आणि संभाव्य आघाडीबाबत या वेळी सविस्तर चर्चा झाली.

Adv. Prakash Ambedkar : सत्तेत असताना सातबारा कोरा का केला नाही?

बैठकीत महाविकास आघाडीबरोबरच स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा पर्याय देखील उपस्थित झाला. पूर्व क्षेत्रातील कार्यकर्ते निवडणुकीस सज्ज असल्याचे मत बैठकीतून पुढे आले.

डॉ. देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या भावना व मते प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. तसेच काँग्रेसला निवडणूक सोपी व्हावी यासाठी आवश्यक नियोजन करण्याचा विश्वास दिला.

Advance tax : महाराष्ट्राला केंद्राकडून 6,418 कोटींचा कर ॲडव्हान्स!

या बैठकीस प्रदेश महासचिव प्रकाश तायडे, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, महेश गणगणे, महेंद्र गवई, मधुसूदन भटकर, अक्षय राऊत, कपिल रावदेव, महानगर पूर्व अध्यक्ष दत्ता देशमुख, संदेश वानखडे, प्रशांत प्रधान, नीलकंठ पाचपोहे, विनोद नालट, देवीदास नेमाडे, सोमेश डिगे आदी मान्यवर उपस्थित होते.