व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण OBCs’ Battle for Their Rights : तुमचे अर्थमंत्री आमच्याशी असे का वागतात...

OBCs’ Battle for Their Rights : तुमचे अर्थमंत्री आमच्याशी असे का वागतात ?

OBC Leader Vijay Wadettiwar Questions Chief Minister Devendra Fadnavis : ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Nagpur : सारथी आणि बार्टीच्या नियमांप्रमाणे महाज्योतीलाही निधी देणे बंधनकारक आहे. वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे गेल्या कित्येक दिवसांपासून फाईल पडून आहे. २०२४च्या निर्णयानुसार सर्व संस्थांना एकसारखा निधी देणे आवश्यक आहे. या सर्व संस्थांच्या नोंदणीपासून पीएचडी विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देणे बंधनकारक आहे. पण दोन संस्थांना निधी देऊन महाज्योतीची फाईल मात्र पेंडींग ठेवण्यात आली. तुमचे अर्थमंत्री आमच्याशी असे का वागतात, हे मला मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे, असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

नागपुरात आज (११ ऑक्टोबर) पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सारथीची कोट्यवधी रुपयांची इमारत बांधली आणि अजूनही महाज्योतीच्या इमारतीचा पत्ता नाही. त्यासाठी पैसे नसल्याचे कारण सांगितले जाते. मुख्यमंत्री ओबीसींच्या भरवशावर निवडून येतात. मग ओबीसींकडे लक्ष का देत नाहीत? १५ टक्के लोकांसाठी वारेमाप पैसा खर्च केला जातो आहे. मात्र ५४ टक्के असलेल्या ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडले आहे. काल आम्ही मोर्चा काढल्यानंतर हे सांगतात की २८ ऑक्टोबरपर्यंत आम्ही जागा शोधणार. मग आत्तापर्यंत काय झोपले होते का, असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी केला.

controversy : कबूतरांसाठी धर्मसभा; जैन मुनींच्या वक्तव्यावर राजकीय वाद !

बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना जसा नोंदणीच्या दिनांकापासून निधी दिला, तसा महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनाही द्या. आमच्यावर अन्याय करू नका, अजित दादांची भूमिका ही नेहमीच ओबीसींवर अन्याय करणारी राहिलेली आहे, हे मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगणार आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. हे कसलं ओबीसीचे सरकार? एवढी मोठी गॅप कशी असू शकते, एकाला साडेतेरा हजार कोटी कर्जासाठी द्यायचे. त्यांनी पोकलेन, जेसीबी, ट्रक घ्यायचे, धंदा करायचा आणि दुसरीकडे महामंडळाला ५०० कोटी रुपये देऊ शकत नाही. हा अन्याय दूर झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Jain Dharma Sabha : जन कल्याण पार्टीची स्थापना, पक्षचिन्ह कबूतर

..तर ५४ टक्क्यांना कसे आवराल?
अजित दादा आमच्यावर अन्याय करतात, भेदभाव करतात. सारथीची फाईल किती वेळात क्लिअर होते, हे आम्हाला माहिती आहे. आमची फाईल सहा-सहा महिने पडून राहाते. हे आता आम्ही जास्त काळ चालू देणार नाही. एक उपमुख्यमंत्री ठाण्यात बसवला आहे. दुसरा उपमुख्यमंत्री पुण्यात आहे. तर मुंबईत मंत्रालयात सहाव्या माळ्यावर स्वतः मुख्यमंत्री बसले आहेत. मनोज जरांगेंनी मुंबई जाम केली म्हणून कशाही पद्धतीने निर्णय घ्याल का, असा सवाल करत वडेट्टीवार यांनी सरकारला गंभीर इशारा दिला. आता ५४ टक्के एकत्र येत आहेत. ओबीसी समाज पेटला आहे. तुम्हाला १५ टक्के आवरता आला नाही, मग ५४ टक्के कसा आवराल? जर जीआर रद्द झाला नाही, तर आम्ही हे करूनच दाखवू, असा दम विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला.

error: Content is protected !!